शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जोगेश्वरीतील त्रस्त नागरिकांनी पोलिसांना घातले साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 13:17 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठळक मुद्देजोगेश्वरी (पश्चिम) येथे एस.व्ही. रोडवरील क्रिस्टल सोसायटीतील रहिवाशांनी याबाबत ओशिवरा पोलिसांना निवेदन सादर केले आहे. न्यायालयात सीआरपीसी 107 अंतर्गत खटला दाखल करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक रामसिंग घाटगे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत दिली.

मुंबई - हत्येच्या प्रयत्नासह फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींविरूद्ध ओशिवरा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही आरोपींच्या कारवायांना आळा बसत नसल्याने त्यांच्याविरूद्ध एमपीडीएअन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून ओशिवरा पोलिसांकडे करण्यात आली आहे.जोगेश्वरी (पश्चिम) येथे एस.व्ही. रोडवरील क्रिस्टल सोसायटीतील रहिवाशांनी याबाबत ओशिवरा पोलिसांना निवेदन सादर केले आहे. आसिफ फकीर मोहंमद खान आणि सादीक फकीर मोहंमद खान या भावांविरूद्ध झहीरूद्दीन अब्दुल रशिद काझी या रहिवाशाच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सादीक फकीर मोहंमद खानविरूद्ध क्रिस्टल सोसायटीच्या अध्यक्षांनी केलेल्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी सोसायटीच्या बँक खात्यातील 1 लाख 90 हजार रूपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनेक अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. सोसायटीच्या आवारात अतिक्रमण केल्याप्रकरणीही तक्रार दाखल आहे. प्रतिबंधक कारवाई म्हणून दोन्ही आरोपींविरूद्ध आतापर्यंत चाप्टर केस तसेच न्यायालयात सीआरपीसी 107 अंतर्गत खटला दाखल करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक रामसिंग घाटगे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत दिली. मात्र तरीही आरोपींकडून कारवाया सुरू असून त्याबाबत तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे एमपीडीएअन्वये कारवाई करण्यात यावी, असे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना सादर केले आहे.

प्रतिबंधक कारवाई म्हणून दोन्ही आरोपींविरूद्ध आतापर्यंत चाप्टर केस तसेच न्यायालयात सीआरपीसी 107 अंतर्गत खटला दाखल करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक रामसिंग घाटगे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत दिली.

 
टॅग्स :PoliceपोलिसDrugsअमली पदार्थHigh Courtउच्च न्यायालय