शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पार्टीत विघ्न! बुफेच्या रांगेत साडीच्या पदराने पेट घातला, महिलेचा होरपळून मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:27 IST

Woman dies of burns after sari catches fire : याप्रकरणी एलिसब्रिज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहमदाबाद - फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बुफेच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या साडीचा पदर पेटल्याने ती गंभीररीत्या भाजली होती. मात्र दुर्दैवाने सहा दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. गुजरातमधील अहमदाबाद शहरात २६ जानेवारीला ही घटना घडली होती. ५४ वर्षीय रश्मिका शहा यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हॉटेल फोर पॉईंट्स बाय शेरेटॉन या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. रश्मिका यांचे पती उमेश शहा यांच्या कंपनीने या हॉटेलमध्ये डिनरचे आयोजन केले होते. यावेळी आपल्या पतीसोबत उपस्थित असलेल्या रश्मिका यांच्या सिंथेटिक साडीचा पदर पेटला. त्या ६० टक्के भाजल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, साडीला आग लागून ५४ वर्षीय महिला होरपळून मृत्युमुखी पडल्याची खेदजनक घटना अहमदाबाद शहरात घडली आहे. मणिनगरमधील गंगेश्वर सोसायटीत राहणाऱ्या रश्मिका शहा यांचा सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. २६ जानेवारी रोजी एलिसब्रिज येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बुफेच्या रांगेत असताना रश्मिका यांच्या साडीने पेट घेतला होता. रश्मिका बुफे टेबलवर त्यांची प्लेट भरत होत्या, त्यावेळी त्याच्या सिंथेटिक साडीचा शेफिंग डिशच्या खाली सुरु असलेल्या आगीला स्पर्श झाला आणि साडीला आग लागली. आगीत रश्मिका ६० टक्के भाजल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल केलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे पोलीस निरीक्षक एच व्ही घेला यांनी सांगितले. याप्रकरणी एलिसब्रिज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हॉटेल संचालक मॅरियट इंटरनॅशनल ग्रुपच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न टाईम्स ऑफ इंडियाने केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

बापरे! भररस्त्यात बेवारस सूटकेसमध्ये सुरु होती हालचाल; उघडून पाहताच सगळेच झाले थक्क

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGujaratगुजरातhotelहॉटेल