शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेताच्या बांधावरील झाडाच्या फांद्या तोडण्यावरून वाद; एकाची हत्या, चार जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 13:27 IST

झाडाच्या फांद्या तोडण्यावरून झालेल्या वादात  एकाची हत्या, तर चार जण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील सिरसोली येथील घटना गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे.

लोकमत न्युज नेटवर्क धनज बु. (वाशिम):  शेताच्या बांधावर असलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यावरून झालेल्या वादात  एकाची हत्या, तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना धनज बु पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम सिरसोली येथे २४ जून रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दाखल फिर्यादीवरून धनज बु. पोलिसांनी चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी आनंदा महादेव घाटे (६६, रा. सिरसोली, ता. कारंजा) यांनी फिर्यादीत असे नमूद केले आहे की. फिर्यादीने बटईने केलेल्या शेतजमिनीच्या धुºयावरील झाडाच्या फांद्या तोडल्यावरून आरोपी अंकुश गजानन सुलताने, मनिष गजानन सुलताने, गजानन भिमराव सुलताने  व प्रमिला गजानन सुलताने सर्व रा. सिरसोली यांनी फिर्यादीशी वाद घातला. त्यावेळी फिर्यादीचा जावई ईश्वरदास जानराव महिंगे (४०, रा. फुलामला, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) यांनी आरोपी व फिर्यादीची समजूत काढून वाद घालू नका, असे सांगितले. त्यावेळी आरोपी प्रमिला सुलताने हिने हा ईश्वरदास आपल्या भांडणात का आला, याला जिवे मारून टाका, असे तिच्या मुलांना म्हटले. त्यानंतर आरोपी अंकूश सुलताने याने ईश्वरदास महिंगे यांच्या पोटात गुप्ती भोसकली, तर मनिष सुलताने याने ईश्वरदास महिंगे यांच्या पाठीत चाकू भोसकला, तसेच प्रमिला सुलताने हिने ईश्वरदास महिंगे यांच्या डोक्यावर दगड मारला. त्यात ईश्वरदास महिंगे यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच दरम्यान आरोपी गजानन सुलताने याने फिर्यादी आनंदा महादेव घाटे, शकुंतला घाटे व सुनंदा घाटे यांच्या डोक्यावर भाल्याने वार करून जखमी केले, तर अंकूश सुलताने यांनी मृतक ईश्वरदास महिंगे यांचा मुलगा अक्षय महिंगे यालाही गुप्ती मारून गंभीर जखमी केले. पोलिसांनी या चौघांवर धनज बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथील ईर्विन रुग्णालयात हलविले, तसेच आरोपी अंकूश गजानन सुलताने, मनिष गजानन सुलताने, गजानन भिमराव सुलताने  व प्रमिला गजानन सुलताने या चौघांवर कलम ३०२, ३०७, ३२६, ५०४, ३४, भादंवि सहकलम ४, २५ शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीKaranjaकारंजा