शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दुचाकीवरील स्टंटबाजीतून वाद; मध्यरात्री चौघांनी घेरले, तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 20:38 IST

Crime news Nagpur: अनेक दिवसांपासून सुरू होती कुरबुर : चौघांना अटक पोलिसांनी रात्रीपासून धावपळ करून चारही आरोपींना अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्या दोन गटात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान रविवारी एका तरुणाच्या हत्येत झाले. सैफ अली उर्फ शाहरुख शौकत अली (वय २६) असे मृताचे नाव असून तो महाल मधील तुळशीबाग परिसरात रहात होता. त्याची हत्या करणारे आरोपी बाबल्या उर्फ लक्ष्मण दशरथ हिवराळे, विनायक इसकापे, आर. के. पटेल आणि बंटी जैस या चौघांना पोलिसांनी अटक केली.

 महाल आणि गणेशपेठ भागतील   काही तरुण विनाकारण वर्दळीच्या भागातून दुचाकी वेगात चालवून स्टंटबाजी करतात. आपल्या वस्तीत बाहेरचा कुणी स्टंटबाजी करत असेल तर दुसऱ्या टोळक्याचे तरुण त्याच्या वस्तीत जाऊन तशीच स्टंटबाजी करतात. यावरून दोन्ही गटांमध्ये वर्षभरापासून कुरबुरी सुरू आहेत. हाणामाऱ्या आणि वाहन तोड-फोडण्याचेही प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर, आरोपी बाबल्या रविवारी रात्री ९ च्या सुमारास वेगात दुचाकी चालवत असल्यावरून त्याचा आदर्श समुद्रे सोबत वाद झाला. दोघांनीही त्यांच्या मित्रांना बोलवून घेतले. तेव्हा कसेबसे प्रकरण निपटले. त्यानंतर महाल परिसरात दबा धरून आरोपी बाबल्या आणि त्याचे साथीदार विरोधी गटातील तरुणांची  वाट पाहू लागले. रात्री १० वाजले तरी कुणी आले नसल्यामुळे ते आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर रात्री अकरा वाजता सैफ अली त्या भागात त्यांना एकटा आल्याचे कळले. त्यामुळे आरोपी बाबल्या, इसकापे, पटेल आणि बंटी हे चौघे त्याच्यावर धावून गेले. त्याला जबर मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी सैफ अली पळू लागला. मात्र आरोपींनी त्याला पकडून त्याच्या डोक्यात सिमेंटची फळी घातली. नंतर शस्त्राचे घाव घालून त्याला ठार मारले. प्रचंड तणावया घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कोतवालीचे ठाणेदार भोसले, पोलीस उपायुक्त लोहित मतानी आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. सैफ अलीची हत्या झाल्याचे कळल्यानंतर त्याच्या गटातील साथीदार मोठ्या संख्येत त्या भागात चालून आले. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मोठा पोलीस ताफा या भागात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला. सोमवारी दिवसभर या भागात प्रचंड तणावाचे वातावरण होते.आरोपींना मंगळवारी न्यायालयात नेणार  पोलिसांनी रात्रीपासून धावपळ करून चारही आरोपींना अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.नाहक गेला जीव आरोपी बाबल्याची खुन्नस समुद्रे सोबत होती. सैफ अली हा समुद्रेचा मित्र असल्याने दोघांच्या वादात त्याचा नाहक जीव गेला. सैफच्या घरी पुढच्या महिन्यात विवाह समारंभ असल्याची चर्चा आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांवर तीव्र शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर