शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वानवडीत मुलीच्या छेडछाडीतून वाद, तरुणाच्या खुनाचा प्रयत्न ; ७ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 16:55 IST

मुलीला आरोपीच्या बहिणीचा मुलगा छेडत होता. त्यावरुन त्यांच्यात १५ दिवसांपूर्वी भांडणे झाली होती..

ठळक मुद्देयाप्रकरणी एका २५ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे दिली फिर्याद

पुणे : मुलीची छेडछाड केल्याप्रकरणातून झालेल्या भांडणातून तरुणावर लोखंडी रॉड, कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी वानवडीपोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. बबलु चित्रु परदेशी (वय ५१), रिषभ, बबलु परदेशी (वय १९), आकाश पप्पापरदेशी (वय २८), राजू चित्रू परदेशी (वय ५९, रा़ गंगानगर, फुरसुंगी) वतीन महिलांना अटक केली आहे. ही घटना वानवडी गावातील छत्रपती शिवाजी पुतळासमोर ७ जून रोजी रात्री सव्वाआठ वाजता घडली. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या बहिणीच्या मुलीला आरोपीच्या बहिणीचा मुलगा छेडत होता. त्यावरुन त्यांच्यात १५ दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. परंतु, त्यांनी आपसात मिटवून घेतल्याने कोणी तक्रार दिली नाही. त्यानंतर, फिर्यादी ,त्यांची आई व बहिण हे गप्पामारत घरासमोर बसले असताना आरोपी महिला तेथे आल्यावर त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यात त्यांच्यात झटापट झाली. त्यावेळी फिर्यादीचे मेव्हणे शक्ती बिडलान हे तेथे आले. त्यांना फिर्यादी यांनी घडलेला प्रकार सांगितले. त्याचवेळी सर्व आरोपी हातात लोखंडी रॉड, लाकडी स्टम्प, लोखंडी कोयता घेऊन आले व त्यांनी शक्ती बिडलान याच्या डोक्यावर, हातावर जबर मारहाण केली. त्यात शक्ती बिडलान हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन ७ जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सलिम चाऊस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :WanvadiवानवडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक