शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांचा वाद विकोपाला; घरी बोलावून झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 13:04 IST

गोळीबारात एक जण ठार

ठळक मुद्देदोघे अटकेत

लातूर : दोघा मित्रातील वाद विकोपाला गेल्याने त्याचे पर्यावसान गोळीबारात झाले़ ही घटना मंगळवारी रात्री उशिरा प्रकाशनगरात घडली़ त्यात राहुल मन्नाडे हा ठार झाला असून,  मयताचा मित्र आणि त्याच्या वडिलांना एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे़ 

राहुल मन्नाडे (रा. पाखरसांगवी ता. लातूर) आणि अमोल ऊर्फ गणेश अण्णासाहेब गायकवाड (रा. प्रकाश नगर, लातूर) या दोघांमध्ये मंगळवारी रात्री बाचाबाची झाली. दरम्यान, अमोल ऊर्फ गणेश गायकवाड याने राहुल मन्नाडे यास घरी बोलाविले़ तेव्हाही दोघांमधील वाद मिटला नाही. तो अधिक विकोपाला गेला़ त्यातून राहुल मन्नाडे याच्यावर अमोलने बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. दरम्यान, जखमी झालेल्या राहुल मन्नाडेला त्याच्या काही मित्रांनी लातूरच्या शासकीय व सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारी रात्री उशिरा दाखल केले. दरम्यान,  राहुलचा उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला. 

या प्रकरणी विकास ऊर्फ विक्की युवराज मन्नाडे (२४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अमोल ऊर्फ गणेश अण्णासाहेब गायकवाड, अण्णासाहेब सदाशिव गायकवाड या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. तपास पोउपनि. एस.ए. शिरसेवाड करीत आहेत.

पोलिसांकडून कारणांचा शोधगोळीबाराची घटना समजताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, सदरची घटना नेमकी कोणत्या कारणावरुन घडली, हे अजून पुढे आले नाही. मयत राहुल मन्नाडे याच्यावर गोळी झाडल्या प्रकरणात पिता-पुत्रावर गुन्हा दाखल झाला आहे़ त्यात नेमकी कोणी गोळी झाडली, याचा शोध पोलीस घेत आहेत, असे अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी सांगितले़  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद