शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शीळ-डायघरमधील हत्येचा २४ तासांत उलगडा; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 01:29 IST

मोकाशीपाडा येथे डोक्यात दगड घालून केलेल्या हत्येचा शीळ-डायघर पोलिसांनी २४ तासांत उलगडा केला. मारुती पवार असे मृताचे नाव आहे.

ठाणे : मोकाशीपाडा येथे डोक्यात दगड घालून केलेल्या हत्येचा शीळ-डायघर पोलिसांनी २४ तासांत उलगडा केला. मारुती पवार असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सुनील शाहू (२०) आणि रंजय शहा (२०) या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.१५ नोव्हेंबरला शीळ-डायघर पोलिसांना मोकाशीपाडा येथे एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची माहिती मिळाली होती. मात्र गुन्ह्यासंबंधी कोणतेही धागेदोरे हाती नसताना पोलिसांनी पथक नेमून तपास करून शुक्रवारी सुनीलला त्याच परिसरातून अटक केली, तर रंजय याला मुंबईतील वडाळा येथून अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पवार हा नेहमी त्रास देत असल्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले. अटक केलेले आरोपी हे मूळचे झारखंडचे रहिवासी आहेत. या गुन्ह्यामध्ये राज चेपांगन चेपांग (२२) आणि भाई काजी चेपांग यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांचा शोध सुरू आहे, असे सायगावकर यांनी सांगितले.आरोपींचे कपडे, दगडाची होणार तपासणीआरोपींनी पवार यांना मारहाण करून फरपटत नेऊन त्यांच्या डोक्यात दोन वेळा १२ ते १५ किलोचा दगड घालून ठार केले. दगड आणि रक्ताचे डाग असलेले आरोपींचे कपडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत.असा झाला उलगडाप्रत्यक्षदर्शी किंवा सीसीटीव्ही फुटेज नसल्याने पोलिसांना आरोपींपर्यंत पोहचण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांचा शोध घेतला. तसेच या घटनेनंतर परिसरातील कोणी गायब आहे का, याचा शोध घेतला असता एक हॉटेल अचानक बंद झाल्याचे समजले. तसेच तेथील चार जण गायब झाल्याची माहिती पुढे आली आणि या प्रकरणाचा छडा लागला. याप्रकरणी ६० ते ६५ जणांची चौकशी केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांनी सांगितले.आरोपी अशिक्षितअटकेतील सुनील आणि रंजय हे अशिक्षित आहेत. ते तीन महिन्यांपासून शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काम करत होते. तर फरार आरोपीही याच परिसरात असण्याची शक्यता आहे. तसेच हॉटेल मालकाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या पथकाची कामगिरीवरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे,अशोक भंडारे, कृपाली बोरसे,पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे,पोलीस हवालदार प्रकाश शिरसाठ, संतोष शिंदे,चंद्रकांत गोफणे, पोलीस नाईक राकेश सत्रे, दीपक जाधव,अजिज तडवी,पंकज गायकर,रतिलाल वसावे, हेमंत भामरे,पोलीस शिपाई प्रदीप कांबळे, आण्णासो एडके यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी