शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घृणास्पद! तरुणाने आधी श्वानाला चाकूने कापले, नंतर प्यायला रक्त, पोलीस म्हणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 21:27 IST

The young man first cut the dog with a knife : मिळालेल्या माहितीनुसार, ३ दिवसांपूर्वी दबोह भागातील २५ वर्षांच्या तरुणाची आई आणि छोट्या भावाला सोबत घेऊन लग्नात गेले होते.

ग्वाल्हेर/भिंड -  भिंड जिल्ह्यात दबोह परिसरात एका तरुणाने पाळीव श्वानाला कापलं  आणि चावून खाल्ल्यांचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. तरुणाने आपल्या घराच्या छतावर श्वानाला चाकूने कापलं. इतक्यावरच न थांबता त्याने आपल्या परिसरातील लोकांसमोर श्वानाचं रक्त प्यायला. या प्रकरणात स्थानिकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात काहीच करू शकत नसल्याचं सांगितलं. स्थानिकांनी सांगितलेल्या या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ दिवसांपूर्वी दबोह भागातील २५ वर्षांच्या तरुणाची आई आणि छोट्या भावाला सोबत घेऊन लग्नात गेले होते. तरुण घरात एकटाच होता.  त्याने गच्चीवर बांधलेल्या श्वानाला कापलं आणि त्याचं रक्त प्यायला. यानंतर तो श्वानाला चावून खाऊ लागला. नंतर त्याने घराच्या खिडकीत श्वानाची त्वचा आणि मृतदेह उलटा लटकवला. कोणीही त्याच्या घरासमोरून जात असे, तेव्हा तो कुत्र्याचा मृतदेह चाटत होता. भयानक प्रकार पाहून त्रासलेल्या स्थानिकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आणि पोलिसात धाव घेतली. यानंतर कुटुंबीयांनी तरुणाला खोलीत बंद केलं.

स्वयंपाकास उशीर झाल्याने पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीला डिझेल ओतून पेटवले

अर्धनग्न अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय, एका आरोपीला अटक

३ वर्षांपासून हा तरुण मानसिकदृष्ट्या आजारी आहे. ग्वाल्हेरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे की, तरुण वेडा आहे. गेल्या वर्षी या तरुणाने रहीस नावाच्या व्यक्तीच्या डोक्यावर काठी मारून त्याचं डोकं फोडलं होतं. यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली होती. आता श्वानाला कापून खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. दबोह पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सांगितलं की, याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून कळालं. पोलीस तेथे पोहोचले होते. खोलीत बंद असलेला तरुण विक्षिप्त आहे. त्याच्यावर उपचार करण्याची आवश्यकता आहे. पोलीस या प्रकरणात काहीच करू शकत नाही.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdogकुत्रा