शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नीट प्रकरणी माेबाईलमध्ये अनेकांशी व्यवहार केल्याचं उघड; CBI अधिकाऱ्यांची माहिती

By राजकुमार जोंधळे | Updated: July 3, 2024 05:21 IST

हे प्रकरण देशभर गाजत असून, यातील काही आराेपी अद्यापही हाती लागले नाहीत.

लातूर - नीट गुणवाढसंदर्भाने लातुरात दाखल गुन्ह्यातील चारपैकी दाेघांना पाेलिसांनी अटक करुन प्राथमिक तपास केला आहे. त्यांच्याकडून ताब्यात घेतलेले कागदत्र, माेबाईल ‘डेटा’मधून आराेपींनी अनेकांशी आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी मंगळवारी लातूर न्यायालयाला दिली. आता या गुन्ह्याशी संबंधित तपशील सीबीआय जमा करणार आहे. यातून नीट प्रकरणाचे नेटवर्क आणि त्याची व्याप्ती समाेर येणार आहे.

नीट प्रकरणाचे धागेदाेरे देशातील काही राज्यात असल्याची माहिती समाेर आल्यानंतर सीबीआयने हा तपास हाती घेतला. लातुरातील नीट प्रकरणाचा तपासही सीबीआयकडे रविवारी वर्ग झाला आहे. लातूर पाेलिसांकडून साेमवारी दिवसभर आराेपींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. स्थानिक तपास यंत्रणांकडून सर्व कागदपत्रे, इतर जप्त मुद्देमाल लातूर पाेलिसांनी सीबीआयकडे द्यावा, असा आदेश लातूर न्यायालयाने दिला हाेता. दरम्यान, तपास केलेल्या सर्वच कागदपत्रांची वर्गवारी करण्यात आली आहे. सीबीआयने आराेपींचा साेमवारी रात्रीच ताबा घेतला आहे.

हे प्रकरण देशभर गाजत असून, यातील काही आराेपी अद्यापही हाती लागले नाहीत. अटकेतील आराेपींच्या माेबाईलमधून अनेक लाेकांशी आर्थिक व्यवहार झाल्याचा संदर्भ समाेर आला आहे. आराेपींनी स्वत:बराेबरच इतर नातेवाईकांच्या नावावर काही आर्थिक व्यवहार केले आहेत. याचा तपास, सर्व तपशील सीबीआयकडून जमा करण्यात येणार आहे.

इतर परीक्षांचीही प्रवेशपत्रे आढळली

नीटशिवाय इतर परिक्षांची प्रवेशपत्रे आराेपींच्या व्हाॅटस्अॅपमध्ये आढळून आली आहेत. त्याचाही तपास आता सीबीआय करणार आहे. लातुरातील आराेपींच्या संपर्कात काेण-काेण आले आहे. याचा शाेध घेत हे ‘कनेक्शन’ इतर किती जिल्ह्यात पाेहचले आहे. याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयने न्यायालयात दिली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागneet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीक