शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
3
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
4
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
5
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
6
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
8
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
9
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
11
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
12
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
13
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
14
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
15
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
16
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
17
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
18
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
19
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
20
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा

पती, पत्नी अन् वो! सुमसान रात्र, पोत्यात सापडला मृतदेह, CCTV नं उलगडलं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 10:15 IST

मुंबईच्या नेहरू नगर परिसरात नाल्यात एक पोतं पडलं होते. सुरुवातीला लोकांचे लक्ष त्याकडे गेले नाही. परंतु त्या पोत्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे लोक त्रस्त झाले.

मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबईत एका पोत्यात महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ना कोणता पुरावा सापडला, ना साक्षीदार. हे रहस्य उलगडणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं होते. परंतु अचानक एक व्यक्ती पोलिसांकडे पोहचतो त्यानंतर या मर्डर मिस्ट्रीचा खुलासा होता जे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. 

५ ऑक्टोबर २०२२ दुपारी १ वाजता - नेहरू नगर

मुंबईच्या नेहरू नगर परिसरात नाल्यात एक पोतं पडलं होते. सुरुवातीला लोकांचे लक्ष त्याकडे गेले नाही. परंतु त्या पोत्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे लोक त्रस्त झाले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोतं पाहिले असता त्यात एखादी वस्तू दाबून बसवली असून त्यानंतर ती बांधण्यात आल्याचं दिसलं. घटनास्थळी पोलिसांनी नाल्यातून हे पोतं बाहेर काढले आणि उघडले असता पोलिसांसह आसपासच्या लोकांना मोठा धक्का बसला. या पोत्यात महिलेचा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत सापडला होता. 

पोलिसांसमोर तपासाचं आव्हानइतकी गर्दी असणाऱ्या या परिसरात मृतदेह पोत्यात भरून नाल्यात फेकला कुणी? गुन्हेगारानं पुरावे मिटवण्यासाठी नेहरू नगरचा नाला का निवडला? गुन्हेगार याच परिसरात राहणारा होता? की दुसऱ्या परिसरातून येऊन त्याने हे पोतं फेकून निघून गेला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधायची होती. पोलिसांनी मृतदेह राजावाडी हॉस्पिटलला पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यानंतर अज्ञाताविरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी ४ पथके बनवली. तपासाला सुरुवात झाली. 

पोलिसांनी खबरी, दुकानदार, रिक्षाचालक यांची चौकशी सुरू केली. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर पोलिसांसमोर स्वत: प्रत्यक्षदर्शी हजर झाला. मृतदेह सापडल्यानंतर तपासाला सुरुवात केली आणि एक रिक्षाचालक पोलिसांसमोर पोहचला. त्याने असा खुलासा केला की पोलिसही हादरले. १ ऑक्टोबरच्या रात्री २-३ दरम्यान हे पोतं नाल्यात फेकलं. रिक्षात बसलेल्या २ महिलांनी हे पोतं नाल्यात फेकले. ज्यारात्री ही घटना घडली तेव्हा त्या माझ्याच रिक्षात बसल्या होत्या. 

कोण होत्या त्या महिला?

या प्रकरणाचा छडा लवकर लागेल असं पोलिसांना वाटलं. परंतु प्रत्यक्षदर्शी उघडपणे समोर बोलण्यास घाबरत होता. जर काही सांगितले तर त्या खूनी महिलांचा शिकार आपण होऊ अशी भीती त्याच्या मनात होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला सुरक्षा देण्याबाबत भरवसा दिला. त्यानंतर त्याने पोलिसांना जे सत्य सांगितले त्याने धक्काच बसला. रात्रीच्या २ वाजता नेहरू नगर बसस्टँडवरून २ महिलांनी रिक्षा भाड्याने घेतली. माहूलजवळ पोहचताच महिलांनी रिक्षा १० मिनिटं थांबवण्यास सांगितली. त्यातील १ महिला घरात गेली. त्यानंतर काहीवेळाने १ पोतं घेऊन ती परतली. महिलांनी पुन्हा नेहरू नगरला नेण्यास सांगितले. त्यानंतर नेहरू नगरच्या नाल्याजवळ उतरून मला जाण्यास सांगितले. त्यानंतर पुढे काय झाले हे माहिती नाही असं त्याने पोलिसांना म्हटलं. 

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात २ महिला पोतं घेऊन जाताना दिसल्या. रिक्षाचालकाकडून पोलिसांनी त्या महिलांची ओळख पटवून घेतली. पोलिसांनी महिलेचा तपास सुरू केला तेव्हा या महिला बहिणी असल्याचं कळालं. मीनल पवार आणि शिल्पा पवार, त्यानंतर दोघींना अटक केली तेव्हा दोघांना खाकीचा हिसका दाखवताच गुन्हा कबूल केला. 

का केली हत्या?

मीनल पवारच्या नवऱ्याचे ईशा मिस्त्री नावाच्या महिलेशी संबंध होते. मीनल आणि पतीचे ईशावरून नेहमी भांडणं व्हायची. परंतु ईशासोबत नाते संपवण्यास पती तयार नव्हता. दोघांची जवळीक वाढतच चालली होती. त्यावरून मीनल आणि तिची बहीण शिल्पा दोघी वैतागल्या होत्या. १ ऑक्टोबरच्या रात्री मीनलचा पती ईशासोबत तिच्या एका डॉली नावाच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. डॉली ही मीनलची फॅमिली फ्रेंड होती. डॉलीने मीनलला फोन करून ईशा आणि तिच्या पतीबद्दल सांगितले. मीनलचा पती ईशाला डॉलीच्या घरी सोडून निघून गेला तेव्हा डॉलीने मीनलला कळवले. त्यानंतर शिल्पासोबत मीनलसोबत तिथे पोहचली आणि तिघांनी मिळून त्या रात्री ईशाचा गळा आवळून खून केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"