शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

"चौथी गोळी लागली नसती तर ती जिवंत असती"; टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणात नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 19:43 IST

टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे.

Radhika Yadav Murder Case: हरियाणातील गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासात नवीन खुलासे झाले आहेत. आरोपी वडील दीपक यादवला कोणत्याही परिस्थितीत राधिकाला जिवंत सोडायचा नव्हतं. याच उद्देशाने त्याने दीपिकावर चार गोळ्या झाडल्या होत्या. जेव्हा राधिकावर तीन गोळ्या चालवूनही ती मरण पावली नाही, तेव्हा दीपकने चौथी गोळी थेट तिच्या हृदयावर झाडली. जर आरोपी दीपक ३ गोळ्या घालून थांबला असता तर राधिका यादवचा जीव वाचू शकला असता. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी हा खुलासा केला आहे.

हरियाणाच्या गुरुग्राममधील वजीराबाद येथे १० जुलै रोजी राधिका यादवची तिच्या वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली. आरोपी दीपकने ५ गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी ४ गोळ्या टेनिसपटू असलेल्या राधिकाला लागल्या होत्या. आरोपी दीपकने राधिका किचनमध्ये असतानाच समोरुन तिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. राधिकाच्या काकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दीपकला अटक केली. लोक मला मुलीच्या कमाईवर जगतो म्हणून टोमणे मारायचे, मी मुलीला टेनिस अकादमी बंद करायला सांगितले होते पण तिने ऐकलं नाही. म्हणून मी तिची हत्या केली अशी कबुली दीपक यादवने दिली होती.

तज्ज्ञांच्या मते राधिकाच्या प्रकरणात जर तिचा पाठीचा कणा आणि आतड्यांना नुकसान झाले असते तर रुग्णाचा जीव वाचला असता. गोळीने संवेदनशील अवयवांना किती नुकसान केले आहे यावर ते अवलंबून असते. परंतु, गोळी हृदयाला लागल्यावर, वाचण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. गोळी लागल्यानंतर आतड्याची शस्त्रक्रिया वेळेवर झाली तर जीव वाचवता येतो. मात्र गोळी हृदयाला लागली तर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो आणि रुग्णाला वाचवणे अशक्य होतं.

माध्यमांच्या वृत्तानुसार, राधिका आणि वडील दीपक यांच्यात अनेक दिवसांपासून तणाव होता. दीपकला राधिकाचे लग्न करायचे होते, पण राधिका यासाठी तयार नव्हती. हत्येच्या तीन दिवस आधी दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता, ज्यामध्ये राधिका, मी विष पिणार नाही आणि स्वतःला फाशीही देणार नाही, मी माझे आयुष्य जगणार आहे, असं म्हणाली होती. या वादानंतर दीपक खूप संतापला. त्याने रागाने राधिकाला सांगितले की आजपासून तुला घराबाहेर जाण्याची गरज नाही. तरीही, राधिका टेनिस कोचिंगसाठी घराबाहेर जात होती. राधिका त्याचे ऐकत नव्हती आणि टेनिस कोचिंग देत होती हे पाहून दीपकला आणखी राग आला. याच रागाच्या भरात दीपकने राधिकाची हत्या करुन टाकली.

दरम्यान, ज्या दिवशी राधिकाची हत्या झाली, त्या दिवशी तिची आईही घरी होती. मात्र, तिची आई मंजू यादव आजारी होती आणि दुसऱ्या खोलीत होती. तिची खोली फक्त १० पावलांच्या अंतरावर होती. पोलिसांना तिने सांगितले की त्यावेळी कुकरची शिट्टी वाजत होती, त्यामुळे तिला गोळ्यांचा आवाज ऐकू आला नाही. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणा