शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या काछीपुऱ्यातील हत्याकांडाचा उलगडा : दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 23:12 IST

काछीपुऱ्यातील हरीश पटेल हत्याकांडाचा उलगडा करून बजाजनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. आपसी वैमनस्य आणि अनैतिक संबंधात झालेला अडसर यातून हे हत्याकांड घडल्याचे पोलीस सांगतात.

ठळक मुद्देअनैतिक संबंधामुळे झाली हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काछीपुऱ्यातील हरीश पटेल हत्याकांडाचा उलगडा करून बजाजनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. रामानुज चित्रसेन पटेल (वय ३५, रा. काचीपुरा) आणि भोला उग्रसेन पटेल (वय ४२, रा. रिवा, मध्य प्रदेश), अशी आरोपींची नावे आहेत. रामानुज हा हरीशचा जावई आहे. आपसी वैमनस्य आणि अनैतिक संबंधात झालेला अडसर यातून हे हत्याकांड घडल्याचे पोलीस सांगतात.हरीश पटेल याने १० वर्षांपूर्वी योगेश पट्टा नामक तरुणाची हत्या केली होती. बहिणीशी योगेशचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याच्या कारणावरून हरीशने ही हत्या केली होती. त्या हत्याकांडातून दोषमुक्त झाल्यानंतर त्याने शंकरनगर चौकात चायनीजचा हातठेला सुरू केला होता. आरोपी रामानुज पटेल हा हरीशच्या वडिलांच्या दुकानात कामाला होता. दरम्यान हरीशच्या बहिणीशी त्याचे सूत जुळले आणि त्यांनी प्रेमविवाह केला. त्यामुळे हरीश रामानुजवर चिडून होता. यामुळे दोघात अनेकदा वादही झाले होते. दुसरा आरोपी भोला पटेल १५ वर्षांपूर्वी काछीपुऱ्यात राहायला आला होता, नंतर तो निघून गेला. सध्या तो मध्य प्रदेशातील रिवा येथे राहतो. अधूनमधून तो काछीपुऱ्यातील त्याच्या चुलत भावांकडे येतो. हरीशचा भोलावरही राग होता. तो त्याला वस्तीत येण्यास मनाई करीत होता. काही दिवसांपूर्वीच हरीश भोलाच्या मागे चाकू घेऊन धावला होता. हरीशची पत्नी रामानुजसोबत नेहमीच हसतखेळत बोलत होती. बायकोची रामानुजसोबत असलेली मैत्री हरीशला खटकत होती. या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशयही हरीशला होता. त्यामुळे हरीशने बायकोशी अनेकदा रामानुजचे नाव घेत भांडणही केले होते. तिने रामानुजला हे सांगितले होते. आपल्या मैत्रीत हरीश अडसर ठरत असल्याने त्याचा पत्ता कट करण्याची संधी रामानुज शोधत होता.तीन दिवसांपासून रेकीभोलासोबत हरीशचे अनेकदा खटके उडाल्याची माहिती रामानुजला होती. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी भोलाची भेट घेतली. त्याच्याजवळ हरीशचा गेम करण्याचा इरादा त्याला बोलून दाखवला. भोलाने तयारी दर्शविताच या दोघांनी हरीशची तीन दिवसांपासून रेकी केली. तो कधी येतो, कसा येतो, त्याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी घात लावला. शुक्रवारी मध्यरात्री दारूच्या नशेत हरीश घराकडे येत असल्याचे पाहून आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घातला, नंतर भोलाने हरीशचा चाकूने गळा कापून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि दोघेही पळून गेले. हे हत्याकांड उजेडात आल्यानंतर पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगरचे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला. संशयावरून शनिवारी सायंकाळी भोलाला आणि नंतर रामानुजला ताब्यात घेत विचारपूस केली. त्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनArrestअटक