शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गुडविनच्या संचालकांनी ५० कोटींची खंडणी मागणाऱ्याचे नाव जाहीर करावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 21:30 IST

पोलिसांनी बघ्याची भूमिका घेऊ नये; काँग्रेस गुंतवणूकदारांच्या पाठीशी

ठळक मुद्देगुरुवारी संध्याकाळी येथील मानपाडा रस्त्यावरील गुडविन ज्वेलर्सच्या बंद दुकानासमोर शेकडो ग्राहक जमले होते.खंडणी मागणारा तो खंडणीखोर कोण आहे? राजकीय लोकप्रतिनिधी नेता आहे का? की अन्य कोणी माफिया आहे याचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावा असेही यावेळी पोलिसांना सांगण्यात आले.

डोंबिवली - गुडविन ज्वेलर्सचे संचालक हे व्हिडिओद्वारे नागरिकांना आवाहन करत आहेत, त्यांनी आधी प्रत्यक्ष लोकांसमोर यावे, तसेच आधी त्यांनी ५० कोटींची खंडणी मागणाऱ्याचे नाव जाहीर करावे असे आवाहन काँग्रेस नेते संतोष केणे, प्रदेश सचिव जोजो थॉमस यांनी केले. गुरुवारी संध्याकाळी येथील मानपाडा रस्त्यावरील गुडविन ज्वेलर्सच्या बंद दुकानासमोर शेकडो ग्राहक जमले होते.

जो तो आम्हाला आमचे पैसे परत द्या अशी मागणी करत होता. त्या ग्राहकांची समजूत घालताना केणे, थॉमस यांनी सांगितले की, काँग्रेस सर्व ग्राहकांसोबत आहे. सामन्यांच्या कष्टाचा पैसा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. कोणीही एकट्याची भावना बाळगू नये असेही ते म्हणाले. जो व्हिडीओ करून आवाहन करतो त्याला पोलीस पकडू शकत नाहीत का? यात काय आणि कोणाकोणाचे गौडबंगाल आहे कळत नाही. सत्ताधारी सत्ता स्थापन करण्यात मशगुल असून सामान्य वाऱ्यावर आहे, अडचणीत सापडला आहे त्याचे काही भान नाही का असा सवाल केणे यांनी केला.त्यामुळे आगामी काळात ठाणे, वाशी, चेंबूर या सर्व ठिकाणी ग्राहक एकत्रीकरण करण्यात येणार असल्याचे थॉमस यांनी जाहीर केले. कोणीही घाबरू नका, देशभरात या बाबत आवाज उठवून सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी आमच्या समवेत ठाणे पोलीस आयुक्त, रामनगर पोलीस यांच्याकडे यावे, आपण त्यांना निवेदन देऊ. लवकरच सत्तास्थापनेचा तिढा सुटेल आणि नंतर लगेच मुख्यमंत्री, गृहमंत्री आदीचीही आपण भेट घेऊ असेही त्यांनी आश्वासन यावेळी दिले. दरम्यान काही ग्राहकांना घेऊन केणे, थॉमस हे रामनगर पोलीस ठाण्यात गेले आणि तेथे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नागरिकांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी केली. तसेच खंडणी मागणारा तो खंडणीखोर कोण आहे? राजकीय लोकप्रतिनिधी नेता आहे का? की अन्य कोणी माफिया आहे याचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावा असेही यावेळी पोलिसांना सांगण्यात आले.

टॅग्स :ExtortionखंडणीPoliceपोलिसdombivaliडोंबिवलीfraudधोकेबाजी