शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महासंचालक म्हणून मी आणि आमची टीम या ठिकाणी जाणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 16:40 IST

पोलीस आणि जवानांनी या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे.

ठळक मुद्दे१५ जवान शहीद झाले आणि एक वाहन चालकाचा मृत्यू झाला. आज १२. ३० वाजता क्विक अॅक्शन टीम (क्यूआरटी) वाहनातून प्रवास करत असताना नक्षल्यांनी हा भ्याड हल्ला केला पोलीस संचालक म्हणून मी आणि आमची टीम या ठिकाणी जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी दिली.  

मुंबई - गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी काल रात्री महामार्गाच्या कामासाठी आणलेली 36 वाहनं जाळली. तसेच आज दुपारच्या सुमारास सीआरपीएफच्या क्युआरटी जवानांना घेऊन जाणाऱ्या गाड्या भूसुरुंग स्फोटात उडवल्या. यामध्ये १५ जवाना शहीद झाले आहेत तर १ वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर पोलीस आणि जवानांनी या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. यासंदर्भातील पत्रकार परिषदेत सर्व माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल देताना म्हणाले केद्रांतून सर्वप्रकारची मदत मिळत आहे. पोलीस संचालक म्हणून मी आणि आमची टीम या ठिकाणी जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी दिली.  

जंगलाचा अभ्यास करून मग योग्य ती कारवाई करू. आमची पथकं घटनास्थळी पोहोचतील आणि त्यानंतर माहिती घेऊन पुढची पावलं उचलली जातील. तसेच पुढे त्यांनी सांगितलं की, या हल्ल्याचा थेट निवडणुकांशी संबंध लावता येणार नाही. अडीच तासात जेवढी माहिती आमच्यापर्यंत आली ती आपल्यासमोर मांडत आहे. आम्ही कायमच दक्ष होतो. आमच्याकडे निवडणूक काळात अशा घटना घडण्याची शक्यता असल्याची माहिती होती, मात्र तसे काही झाले नाही. ही घटना दुर्दैवी आहे, अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही दक्ष राहू. पूर्ण ताकदीनिशी आम्ही नक्षलवाद्यांचा बिमोड करू. जवान या भागातून जात असताना सर्व तयारी केली होती. त्यांच्याविरोधात आम्ही कडक कारवाई करणार आहोत. १५ जवान शहीद झाले आणि एक वाहन चालकाचा मृत्यू झाला. खुराडा पोलीस ठाण्याकडे जात असताना भूसुरुंगाचा स्फोट झाला. कुरखेडा पोलिसांचे हे पथक होते. नक्षलवाद्यांचा भ्याड हल्लाच म्हणावा लागेल असे पोलीस महासंचालक म्हणाले. आज १२. ३० वाजता क्विक अॅक्शन टीम (क्यूआरटी) वाहनातून प्रवास करत असताना नक्षल्यांनी हा भ्याड हल्ला केला अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस