शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 13:46 IST

Digital Arrest Scam: यावर्षी आतापर्यंत 2140 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

Cyber Fraud : सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. आजकाल डिजिटल अरेस्ट, पद्धत खूप चर्चेत आली आहे. MHA सायबर विंग (i4C) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे लुटमारी टोळी या नवीन पद्धतीचा वापर करून दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक करत आहेत.

या घोटाळ्यातील आकडेवारी धक्कादायक आहे. डिजिटल अटकेची पद्धत वापरून आरोपींनी यावर्षी आतापर्यंत 2140 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. दर महिन्याला सायबर गुन्हेगार या पद्धतीचा वापर करून लोकांची सरासरी 214 कोटी रुपयांची फसवणूक करत आहेत.

परदेशातून चालणारे नेटवर्कफसवणुकीच्या या प्रकारात घोटाळेबाज ईडी, सीबीआय, पोलीस किंवा आरबीआयचे अधिकारी असल्याचे भासवतात. मग सर्वसामान्यांना कुठल्यातरी खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देतात. दररोज अनेक लोक या फसवणुकीच्या पद्धतीचे बळी ठरतात. ही फसवणूक कंबोडिया, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस आणि थायलंड या देशांमधून होत आहे.

कंबोडियातील चिनी कॅसिनोमध्ये उभारलेल्या कॉल सेंटरमध्ये डिजिटल अरेस्ट केंद्रे सर्रासपणे सुरू आहेत. MHA सायबर विंगला या वर्षी ऑक्टोबरपर्यंत डिजिटल अटकेच्या एकूण 92,334 प्रकरणांची माहिती मिळाली आहे. तुम्ही अशा घोटाळ्याला बळी पडल्यास ताबडतोब 1930 वर कळवा.

डिजिटल अटक म्हणजे काय?या प्रकारच्या फसवणुकीत सायबर गुन्हेगार तुम्हाला तुमच्या कामावर ट्राय, आरबीआय किंवा कोणत्याही कुरिअर कंपनीमार्फत कॉल करतात. हे आयव्हीआर कॉल्स आहेत, ज्यामध्ये तुमचा नंबर किंवा बँक खाते ब्लॉक करण्यात आल्याचे सांगितले जाते. किंवा योग्य पत्ता न मिळाल्यामुळे तुमचा कुरियर डिलिव्हरी करू शकत नाही.

या कॉलमध्ये कस्टमर सपोर्ट ऑफिसरशी बोलण्यासाठी 9 (हा नंबर दुसराही असू शकतो) दाबायला सांगितले जाते. एखादी व्यक्ती कस्टमर सपोर्ट ऑफिसरशी बोलताच त्यांचा घोटाळा सुरू होतो. सर्वप्रथम ते तुम्हाला सांगतील की, तुमच्या नावावर कर्ज आहे का किंवा बनावट सिम वापरले जात आहे किंवा तुमचे आधार कार्ड ड्रग्जसह पकडले गेले आहे.

यानंतर ते तुम्हाला बनावट पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने घाबरवण्याचा प्रयत्न करतात. या संपूर्ण प्रकरणात हे घोटाळेबाज सुप्रीम कोर्ट, पोलिस, सीबीआय अशा संस्थांच्या नावाने तुम्हाला घाबरवतात. बनावट केस तयार करून, 'डिजिटल अदालत'मध्येही सुनावणी सुरू केली जाते. या सगळ्यासाठी तुम्हाला डिजिटली अटक केली जाते.

डिजिटल अटकेत घोटाळेबाज तुम्हाला कोणाशीही बोलू देत नाहीत, कोणाशीही भेटू देत नाहीत किंवा घराबाहेर पडू देत नाहीत. काही प्रकरणांमध्ये संपूर्ण कुटुंबालाच त्याचा बळी बनवण्यात आले आहे. यामध्ये, सर्व बनावट कृती केवळ स्काईप कॉल किंवा व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर केल्या जातात. शेवटी प्रकरण दडपण्यासाठी घोटाळेबाज तुमच्याकडून पैशांची मागणी करतील. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी