शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Mansukh Hiren Case: 'त्यांचा' अंदाज फक्त अर्ध्या तासानं चुकला; फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 18:34 IST

mansukh hiren case: देवेंद्र फडणवीसांचे सचिन वाझेंसह शिवसेनेवर अनेक गंभीर आरोप

नवी दिल्ली: उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि शिवसेनेच्या संबंधांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे आणि परमबीर सिंह ही केवळ प्यादी आहेत. त्यांचा राजकीय बॉस कोण, याचा शोध घेणं गरजेचं आहे, असं फडणवीस म्हणाले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.“मी मुख्यमंत्री असतानाही सचिन वाझेंसाठी शिवसेनेने...”; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावाख्वाजा युनूस एन्काऊंटर प्रकरणात सचिन वाझेंना २००४ मध्ये निलंबित करण्यात आलं. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काही वेळ त्यांनी शिवसेनेचं प्रवक्तेपददेखील सांभाळलं. २०१८ मध्ये मी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी वाझेंना सेवेत घेण्यासाठी फोन केला होता. शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी माझी भेटदेखील घेतली होती. वाझेंना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. मात्र गंभीर आरोपांखाली निलंबन झाल्यानं मी त्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालतायेत? काँग्रेस नेत्याचा सवालमुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ४ महिने वाझेच वापरत होते. ही गाडी मनसुख हिरेन यांचीच होती. गाडी चोरीला गेल्याचा बनावदेखील वाझे यांनीच रचला. मुंबई पोलीस दलात अनेक वरिष्ठ अधिकारी असतानाही एपीआय दर्जाच्या वाझेंकडे स्फोटक प्रकरणाचा तपास सोपवला गेला. हिरेन यांची चौकशीदेखील त्यांनीच केली. पुढे याच हिरेन यांचा खून झाला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडून झालेला नाही. त्यांच्या फुफ्फुसात पाणी आढळून आलेलं नाही. त्यांच्या तोंडाजवळ रुमाल आढळून आले. श्वास कोंडला गेल्यानं मनसुख यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांनी पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह पाण्यात फेकण्यात आला. मात्र मृतदेह पाण्यात टाकणाऱ्यांचा अंदाज अर्ध्या तासानं चुकला. त्यांनी भरतीऐवजी ओहोटी असताना मृतदेह टाकून दिला. तो वाळूत रुतून बसला, असं फडणवीस यांनी सांगितलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेsachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणShiv Senaशिवसेना