शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

देवेन भारती प्रकरण : बांगलादेशी घुसखोरीबाबत पुरावे नष्ट केल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 07:35 IST

रेश्मा खान संबंधित कागदपत्रे गायब

मुंबई : घुसखोर बांगलादेशी रेश्मा खान विरोधातील कारवाईवरून सहआयुक्त देवेन भारतीसह माजी सहाय्यक आयुक्त दीपक फटांगरे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यावरून खळबळ उडाली असताना, तिच्याविरोधात कारवाईसाठी दिलेली कागदपत्रेही मालवणी पोलिसांसह विशेष शाखेतून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. रेश्माविरोधात कुठलीही कारवाई होऊ नये म्हणून पुरावे नष्ट केल्याचा आरोपही तक्रारदार निवृत्त पोलीस निरीक्षक दीपक कुरुलकर यांनी तक्रारीत केला आहे. कुरुलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रेश्मा खानने योग्य त्या कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करत बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवला. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पुरावे मालवणी पोलीस ठाण्यात देऊनही तत्कालीन  वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी भारती यांचे गुन्हा दाखल करू नये म्हणून आदेश असल्याचे सांगत कारवाई केली नाही. तसेच तत्कालीन सहआयुक्त देवेन भारती यांनी याबाबत पाठपुरावा करू नये, यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार मालवणी पोलिसांनी रेश्मा खानसह देवेन भारती आणि फटांगरे तसेच अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतही गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

काय आहे प्रकरण?गुन्हा दाखल होण्यापूर्वी ६ ऑक्टोबर रोजी कुरुलकर यांनी माहिती अधिकाराद्वारे आय शाखा आणि मालवणी पोलिसांकडे रेश्मा खान हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी जमा केलेल्या कागदपत्रांसह केलेल्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, ५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या उत्तरात मालवणी पोलीस ठाण्यातील २०१८पर्यंतचा अभिलेख नष्ट केला असल्याचे उत्तर देत माहिती देणे टाळल्याचेही कुरुलकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच विशेष शाखेतही कागदपत्रे नसल्याची माहिती मिळाली. पुढे १ डिसेंबर रोजी परिमंडळ ११ कडे अर्ज करत माहिती देण्याची विनंती केली. त्यांनी याबाबत माहिती देण्याचे आदेश देऊनही सहाय्यक आयुक्तांकडून पुरावा नष्ट केल्याची माहिती दिली. त्यामुळे रेश्मा खानविरोधात दिलेली कागदपत्रे, पुरावे नष्ट केल्याचा संशयही त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत वर्तविला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी