शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

Cruise Drugs Case: आर्थर रोड जेलमध्ये अशी गेली आर्यन खानची पहिली रात्र; शेअर करावं लागलं अंथरूण-पांघरूण, मिळालं असं जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 10:06 IST

Cruise Drugs Case : आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक 1 मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला ठेवण्यात आले आहे. त्यांचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही त्यांना स्पेशल क्वॉरंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

मुंबई - क्रूझ ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या शाहरुख खानच्या मुलाला, अर्थात आर्यन खानला अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आर्यन खानच्या वकिलाकडून मुंबईच्या किला कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, तो शुक्रवारी कोर्टाने फेटाळला. यामुळे आर्यनला शुक्रवारची रात्र इतर कैद्यासोबतच आर्थर रोड जेलमध्ये काढावी लागली. यादरम्यान आर्यन खानला कुठल्याही प्रकारची विशेष ट्रिटमेंट देण्यात आली नाही. (Aryan khan first night in prison )

कारागृहात आर्यनची पहिली रात्र -ड्रग्स केस प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनने मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये एक रात्र काढली आहे. आर्यनला जेलमध्ये एका सामान्य कैद्याप्रमाणेच अन्न दिले गेले. याच बरोबर त्याला झोपण्यासाठीही सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच सुविधा देण्यात आल्या. 

स्पेशल क्वॉरंटीन सेंटरमध्ये ठेवले गेले -आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक 1 मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला ठेवण्यात आले आहे. त्यांचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही त्यांना स्पेशल क्वॉरंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

खाण्यासाठी मिळालं असं अन्न -आर्यन खानला जेलमध्ये एका सामान्य कैद्याप्रमाणेच वागणूक मिळत आहे. कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला जेवणात मूंगाची डाळ, भात, पाले भाजी आणि गव्हाची पोळी (चपाती) देण्यात आली.

शेअर कराव्या लागल्या वस्तू - आर्यन आणि अरबाज यांना तुरुंगात एकच पांघरून देण्यात आले. याच बरबोर त्यांना बेडशीट आणि उशीही एकच देण्यात आली आहे. यामुळे त्यांना या वस्तू शेअर कराव्या लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार, बॅरेक क्रमांक 1 मध्ये केवळ एकच पंखा आहे. महत्वाचे म्हणजे, आर्यन खानला आता सोमवारपर्यंत जेलमध्येच राहावे लागणार आहे. सत्र न्यायालय बंद अल्याने जामीन अर्जही दाखल करता येत नाही. यामुळे पुढील प्रक्रिया न्यायालय सुरू झाल्यानंतरच सुरू होईल.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानjailतुरुंगShahrukh Khanशाहरुख खानbollywoodबॉलिवूडNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो