शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

तरुण तेजपाल प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले; तपास अधिकाऱ्यावर न्यायालयाने लावला ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 4:31 PM

Tarun tejpal Caswगायब झालेले फुटेज तेजपालच्या पथ्यावर  

पणजी - तहेलकाचे पत्रकार तरूण तेजपाल विरुद्धच्या बलात्काराच्या प्रकरणात महत्त्वाची असेलेले सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आल्याचा ठपका म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने तपास अधिकाऱ्यावर ठेवला आहे. ती फुटेज नसल्यामुळे पीडीत महिलेचा दावा सिद्ध करणारा पुरावा मिळत नसल्याचे निरीक्षणही न्यायाधीश क्षमा जोशी यांनी नोंदविले आहे.७ ते ११ नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यात बांबोळी येथील ज्या पंचतारीक हॉटेलमधील लिफ्टमध्ये कथित बलात्काराचा प्रकार घडला त्या हॉटेलच्या ७ क्रमांक ब्लॉकमधील दुसऱ्या ब्लॉकवरील फुटेज उपलब्ध आहे तसेच तळमजल्यावरील फुटेज आहे,परंतु पहिल्या मजल्यावरील फुटेज गायब आहे असे खंडपीठाने म्हटले आहे. ही फुटेज का दिसत नाही याची चौकशी न केल्यामुळे तसेच ती मिळविण्यासाठी सीएसएफलकडे प्रयत्न न केल्यामुळे ती तपास अधिकाºयांनीच नष्ट केल्याचे दिसत आहे असे आदेशात म्हटले आहे. क्राईम ब्रंचच्या उपअधिक्षक सुनिता सावंत या प्रकरणातील तपास अधिकारी आहेत. आपल्या कनिष्ठ महिला पत्रकारावर बलात्कार करण्याचे आरोप असलेल्या तेजपालवर गुन्हा नोंद केल्यावर तपास अधिकारी कुठे कमी पडले आहेत याची मोठी यादीच आदेशात नमूद आहे. व्हीडिओ साक्षीला अधिक महत्त्वया पूर्ण प्रकरणात ७० साक्षीदार, पिडितेची साक्ष, आरोपीने पाठविलेले माफीनाम्याचे इमेल अशा प्रमाणात साक्षी क्राईम ब्रँचने न्यायालयाला सादर केले आहेत. न्यायालयाने व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या साक्षींना अधिक महत्त्व दिले आहे. त्यानुसार ब्लॉक नंबर सातच्या पहिल्या मजल्यावरचा लिफ्टजवळील सीसीटीव्ही फुटेज तपास अधिकाऱ्यांनी सादर केली  नाही, हे तपास एजन्सीचे मोठे अपयश ठरविले आहे. हे अपयश आरोपीच्या पथ्यावर पडले आहे. ते फुटेज कुठे गेले?फुटेज तपास अधिकाऱ्यांनी नष्ट केल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्यायालायने म्हटले असले तरी तो निष्कर्ष परिस्थितीजन्य घटनांच्या आधारावर न्यायालाने काढला आहे. या प्रकरणातील सर्व डीव्हीआर क्राईम ब्रेंचने न्यायालयाच्या ताब्यात दिले होते. दुसऱ्या आणि तळमजल्यावरील कॅमऱ्यातून टीपले गेलेले रेकॉर्डिंग तितकेच न्यायालयाला पाहणे शक्य झाले आहे. पहिल्या मजल्यावरील फुटेज पाहता येत नाही. ती नष्ट केलेली असली तरी मदरबोर्ड तपासल्यास ते सहज कळते असा तज्ज्ञांचा दावा आहे. तसेच ही फुटेज ८ वर्षे न्यायालयाच्या ताब्यात होती. इलेक्ट्रॉनिक वस्तु अधिक काळ न वापरल्यास त्या निकामी होण्याचीही शक्ता असते. परंतु विशेष तांत्रिक सहाय्याने त्या पुन्हा वापरास लायकही करणे शक्य असते. हे प्रकरण आता खंडपीठात गेल्यामुळे सर्व डीव्हीआर वापरालायक करण्यासाठी तांत्रिक सहाय्य घेण्यास वाव आहे. तसेच त्यावरील विशिष्ठ रेकॉर्डिंग नष्ट करण्यात आले असल्यास ते करणाऱ्या संशयिताची चौकशीची मागणीही दोन्ही बाजूने होवू शकते, किंवा न्यायालयही तसा आदेश देऊ शकते. 

टॅग्स :Tarun Tejpalतरूण तेजपालgoaगोवाCourtन्यायालयSessions Courtसत्र न्यायालयcctvसीसीटीव्हीPoliceपोलिस