विशाखापट्टनम एक्स्प्रेसमध्ये देशी दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:40 IST2019-08-26T23:40:00+5:302019-08-26T23:40:53+5:30
मलकापूर : भुसावळ कडून नागपूर कडे जाणाऱ्या गांधीधाम विशाखापट्टानम एक्स्प्रेस मधून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक ...

विशाखापट्टनम एक्स्प्रेसमध्ये देशी दारू पकडली
मलकापूर : भुसावळ कडून नागपूर कडे जाणाऱ्या गांधीधाम विशाखापट्टानम एक्स्प्रेस मधून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली.
भुसावळ व मलकापूर रेल्वे पोलिसांनी संयुक्त सापळा रचून सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान गांधीधाम विशाखापट्टनम एक्सप्रेस मलकापुर रेल्वे स्थानकावर आली. तेव्हा एस 6 बोगीमध्ये 9,10,11 क्रमांकाच्या सिट खाली ठेवलेली अंदाजे 10 ते 12 बॅग मध्ये असलेली एक हजार 320 बॉटल देशी दारू पकडली. बाजार भावानुसार तिची किंमत 55 हजार रुपये आहे. याप्रकरणी प्रदीप जनार्धन नेतलेकर (वय 43) रा. कंवर नगर, चेतनगाव हॉस्पिटल जवळ, जळगाव खान्देश यास अटक करण्यात आली.
रेल्वे पोलीस वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे , सहायक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात आलेल्या पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक रोशन जमीर खान, पो.कॉ. भूषण पाटील सह मलकापुर आर पी एफ चे पोलीस निरीक्षक राजेश बनकर पो.उप.नी. मनोहर सीरिया व कर्मचाऱ्यांनी केली. या घटनेमुळे रेल्वेतुन दारुची अवैध वाहतूक करीत असल्याचे समोर आले. आरोपीस अटक करून मुद्देमालासह शेगाव रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोनी राजेश बनकर यांनी दिली.