शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

खेड पंचायत समिती सदस्यांच्या पतीकडे मागितली २५ लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:06 IST

२५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावले. तसेच ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

ठळक मुद्देखंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी, सहा जणांवर गुन्हा दाखल

चाकण : नाणेकरवाडी ( ता.खेड ) येथील पंचायत समिती सदस्याच्या पतीला व एका हॉटेल व्यावसायिकाला २५ लाखांची खंडणी तसेच खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवार ( दि.१४ ) दुपारी तीन ते चारच्या दरम्यान नाणेकरवाडी चाकण येथे घडली. याबाबत गणेश शांताराम जाधव (वय ३५, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कुख्यात गुंड बाळू आप्पा वाघेरे ( पिंपरी, पुणे ), रामनाथ सोनवणे ( रा. कुरुळी, ता.खेड, जि. पुणे ) आणि त्यांच्या ३ ते ४ साथीदारांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात मंगळवारी ( दि. १४ ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी गणेश जाधव यांचे दाजी रमन पवार ( रा. ताथवडे, ता. मुळशी, जि. पुणे ) यांचे ब्ल्यु वॉटर नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान गणेश जाधव हे या हॉटेलवर असताना आरोपी बाळू वाघेरे, रामनाथ सोनवणे आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांनी या हॉटेलवर जाऊन गणेश यांना २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावले. तसेच ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. वरील आरोपींनी फोनव्दारे आणि रस्त्यात गाडी अडवून देखील धमकावल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब डुबे तपास करत आहेत.

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस