शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या आमदाराचे नाव सांगून बिल्डरांकडे खंडणीची मागणी, पोलिसांकडे तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 22:39 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या नावाखाली मोबाईलवरुन बिल्डरांसह काही कंपन्यांना धमक्या देऊन  पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.

पुणे  - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या नावाखाली मोबाईलवरुन बिल्डरांसह काही कंपन्यांना धमक्या देऊन  पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या प्रकरणी आमदार टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आमदार टिंगरे यांच्या नावाने  पैशाची मागणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला असून  मोबाईल  नंबरची तांत्रिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. वडगावशेरी मतदारसंघातील काही बिल्डरांना एका मोबाईल क्रमांकावरुन आमदार टिंगरे यांच्याकडून बोलत असल्याचे सांगत पैशाची मागणी करण्यात आली होती. ज्या मोबाईल क्रमांकावरुन संबधित बिल्डरांना कॉल करण्यात आला होता, त्यावरील ट्रू कॉलर आयडीला एमएलए सुनिल टिंगरे असे नाव ठेवण्यात आले होते. मात्र, ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे पैशाची मागणी करण्यात आली तेच आमदार टिंगरे यांच्या परिचयाचे असल्याने त्यांनी या बाबत संपर्क साधून आमदार टिंगरे यांना विचारणा केली. त्यामुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला.बिल्डरांबरोबरच या मतदारसंघातील वेगवेगळ्या संस्था आणि कंपन्यांमध्ये अशा पध्दतीने पैशाची मागणी केल्याचेही त्यानंतर समोर आले. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन संबधित व्यकतीची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा पध्दतीने कोणाकडून पैशाची मागणी आल्यास त्यांनी तात्काळ आमदार सुनिल टिंगरे यांना किंवा विश्रांतवाडी पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे