शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अटक टाळण्यासाठी साडेतीन लाखाची मागणी; लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह निलंबित हवालदारावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 21:55 IST

Bribe Case : याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार प्राप्त झाली असता पडताळणीमध्ये त्यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देएका व्यापाऱ्याच्या मालाचा अपहार झाल्याचा गुन्हा एपीएमसी पोलीस ठाण्यात गतमहिन्यात दाखल आहे.

नवी मुंबई : अपहाराच्या गुन्ह्यातून अटक टाळण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व एका निलंबित  हवलदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी साडेतीन लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी 1 लाख 40 हजार रुपये स्वीकारले होते. याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार प्राप्त झाली असता पडताळणीमध्ये त्यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट झाले.

एका व्यापाऱ्याच्या मालाचा अपहार झाल्याचा गुन्हा एपीएमसी पोलीस ठाण्यात गतमहिन्यात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक पंकज महाजन यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी एका संशयित आरोपीचे नाव निष्पन्न केले होते. मात्र त्याची अटक टाळण्यासाठी त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जात होती. यासाठी हवालदार सुनील पवारमार्फत त्यांनी संशयीत आरोपीच्या मित्राला जबरदस्तीने मध्यस्थी केले होते. शिवाय त्याने मध्यस्थी न केल्यास त्याला देखील सहआरोपी करण्याची धमकी दिली जात होती.

त्यानुसार संशयित आरोपीची अटक टाळण्यासाठी व खोट्या गुन्ह्यात न गुंतवण्यासाठी महाजन व पवार यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 लाख 40 हजार रुपये स्विकारले होते. मात्र उर्वरित रकमेसाठी त्यांच्याकडून दबाव वाढल्याने तक्रारदार याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार हवालदार सुनील पवारला निलंबित करण्यात आले होते. तर महाजन विरोधात यापूर्वीच एक तक्रार आल्याने त्यामध्ये त्यांची बदली इतर ठिकाणी करण्यात आली होती. दरम्यान प्राप्त तक्रारीच्या आधारे चौकशीत महाजन व पवार यांनी 1 लाख 40 हजार रुपयांची लाच घेतल्याचे स्पष्ट झाले. त्याद्वारे  या दोघांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणNavi Mumbaiनवी मुंबईArrestअटकPoliceपोलिसsuspensionनिलंबन