शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

युवा उद्योजकाच्या वेबसाईटचा डाटा चोरून थेट ऑस्ट्रेलियातून खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:02 IST

युवा उद्योजकाच्या वेबसाईटचा डेटा चोरला

ठळक मुद्देएक आरोपी नाशिकचा तर दुसरा ऑस्ट्रेलियातील रहिवासी आहे़

नांदेड : शहरातील सोमेश बालाजीराव झाडे (१९) या युवा उद्योजकाने तयार केलेल्या वेबसाईटचा डेटा चोरी करून त्याला २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली़ खंडणी न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ यातील एक आरोपी नाशिकचा तर दुसरा ऑस्ट्रेलियातील रहिवासी आहे़

कैलासनगर भागातील यश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सोमेश झाडे  या युवा उद्योजकाने स्वत:ची वेबसाईट सुरु केली होती़ या वेबसाईटच्या माध्यमातून तो ऑनलाईन मार्केटिंग करीत होता़ आपल्या व्यवसायाचा व्याप वाढविण्यासाठी त्याचा अनेकांशी संपर्क आला़ मित्राच्या माध्यमातून नाशिक येथील योगेश भट्ट व त्यानंतर ऑस्ट्रेलियातील ग्लेन गोन्साल्विस या दोघांशी त्याची ओळख झाली़ त्यातून वेबसाईटमधील बरीचशी माहिती झाडे याने त्या दोघांना सांगितली होती़ दोघांनी कंपनीत भागीदार करावे म्हणून झाडे याला त्रासून सोडले होते़ त्यामुळे झाडे याने त्यांच्याशी संपर्क तोडला.

परंतु झाडे याच्या वेबसाईटचा बराचसा डाटा चोरून आपल्या फायद्यासाठी वापरत असल्याचे झाडे याच्या लक्षात आले़ याबाबत झाडे यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी झाडे यालाच २० लाख रुपयांची खंडणी मागितली़ खंडणीची रक्कम न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली़ या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या झाडे याने सुरुवातीला भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली; परंतु पोलिसांनी ही तक्रार घेतली नाही़ त्यामुळे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे धाव घेतली़ मगर यांनी प्रकरण समजून घेऊन सायबर सेलकडे सोपविले़ यानंतर नाशिकचा योगेश भट्ट अन् ऑस्ट्रेलियातील ग्लेन गोन्साल्विसविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdigitalडिजिटलNandedनांदेडPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम