शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्क ऑर्डर काढण्यासाठी लाचेची मागणी; केडीएमसीच्या कनिष्ठ अभियंत्यासह खाजगी प्लंबर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 19:50 IST

Bribe Case :तक्रारदार हे प्लंबिंगची कामे करतात. एका व्यक्तीने त्यांचेकडे नवीन घराकरीता पिण्याच्या पाण्याचे नवीन नळजोडणी महापालिकेकडून मंजूर करून देण्याचे काम दिले होते.

ठळक मुद्देमनपात लाचखोरीची प्रकरणो सातत्याने घडत आहेत त्यात सोमवारी लाखो रूपयांच्या लाच मागितल्याच्या आरोपाखाली दोघा अधिका-यांची आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी चौकशी लावली आहे.

डोंबिवली: कारवाई टाळण्यासाठी लाखो रूपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली केडीएमसीच्या दोन अधिका-यांना नोटीस बजावल्याच्या घटनेला 24 तासांचा कालावधी उलटला नसताना वर्क ऑर्डर काढण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच मागणा-या मनपा पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज आणि खाजगी प्लंबर रविंद्र डाये या दोघांना ठाणो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी डोंबिवली विभागीय कार्यालयात सापळा लावून अटक केली. एकिकडे विकासकामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे अधिकारी लाचेच्या प्रकरणात अटक झाल्याने पुन्हा एकदा केडीएमसीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

तक्रारदार हे प्लंबिंगची कामे करतात. एका व्यक्तीने त्यांचेकडे नवीन घराकरीता पिण्याच्या पाण्याचे नवीन नळजोडणी महापालिकेकडून मंजूर करून देण्याचे काम दिले होते. त्याप्रमाणो केडीएमसीचे फ आणि ग प्रभागातील पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता वाळंज यांनी तक्रारदार यांचेकडे 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 4 हजार रूपये देण्याचे निश्चित झाले. वाळंज यांनी संबंधित रककम खाजगी प्लंबर रविंद्र डायरे याच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार डायरे यांनी रोकड स्विकारली असता दोघांनाही लाच घेतल्याप्रकरणी ठाणो लाचलुचपत विभागाचे पोलिस निरिक्षक विलास मते यांच्या पथकाने  अटक केली.

मनपात लाचखोरीची प्रकरणो सातत्याने घडत आहेत त्यात सोमवारी लाखो रूपयांच्या लाच मागितल्याच्या आरोपाखाली दोघा अधिका-यांची आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी चौकशी लावली आहे. हा प्रकार ताजा असतानाच कनिष्ठ अभियंता लाचप्रकरणी अटक झाल्याने मनपा अधिकारी आणि कर्मचा-यांना लाच स्विकारण्याची लागलेली ‘लत’ काही केल्या संपत नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस