शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence :...म्हणून झाला अंकित शर्मांचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 14:52 IST

Delhi Violence : अंकित शर्मावर हिंसक जमावाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे देखील शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे.

ठळक मुद्देआरोपी हसीन उर्फ सलमान उर्फ मुल्ला उर्फ नन्हे याने आयबी अधिकारी अंकित शर्माला चाकूने चाकूने वार केले होतेमूसा नावाच्या एका व्यक्तीचा मोबाइल फोन इंटरसेप्ट करत असताना सलमानबद्दल स्पेशल सेलने माहिती मिळविली होती.

नवी दिल्ली - इंटेलिजेंस ब्यूरोचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी शवविच्छेदन अहवाल आला आहे. त्यात अंकित शर्माच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज झाला असल्याचे सांगितले गेले आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, फुफ्फुसे आणि मेंदूच्या दुखापतीमुळे अंकित शर्माचा रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. अंकित शर्मावर हिंसक जमावाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे देखील शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. मृत अधिकाऱ्याच्या अंगावर अनेक जखमा दिसून आल्या.सलमानने अंकितवर तीन वार केलेत्याचवेळी गुन्हे शाखेला तपासात आरोपी हसीन उर्फ सलमान उर्फ मुल्ला उर्फ नन्हे याने आयबी अधिकारी अंकित शर्माला चाकूने चाकूने वार केले होते, हे उघड झाले आहे. यापूर्वी निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनच्या घरी उपस्थित जमावाने अंकितला बेदम मारहाण केली होती. तथापि, ताहिरने अंकितवर हल्ला केला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मूसा नावाच्या एका व्यक्तीचा मोबाइल फोन इंटरसेप्ट करत असताना सलमानबद्दल स्पेशल सेलने माहिती मिळविली होती. वास्तविक हिंसाचाराच्यावेळी स्पेशल सेलने चांद बागचा रहिवाशी असलेल्या मूसाचा मोबाइल फोन ट्रेसवर ठेवला होता. त्याचे संभाषण ऐकले जात होते, त्यात सलमानचे नाव समोर आले होते. सलमानचा फोनही ट्रेसवर ठेवण्यात आला होता. यात तो फोनवर एकाला सांगत होता की त्याने एकाला भोसकले आहे. या संभाषणाच्या आधारे स्पेशल सेलने पथकाने गुरुवारी चांद बाग भागातून सलमानला पकडले. तो मूळचा अलिगडचा आहे. यमुनापारमध्ये तो नंदनगरीच्या सुंदरनगरी येथे राहत होता.चौकशीदरम्यान सलमानने सांगितले की, हिंसाचारादरम्यान पोलिसांनी एक गोळी झाडून मुस्लिम कुटुंबातील चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरविली. यामुळे चांद बाग मधील विशिष्ट लोकांचा रोष पेटला आणि त्याने हिंसाचारास सुरूवात केली. दरम्यान, करावल नगर रोडवरील चांद बाग पुलाजवळ दगडफेक झाली. दरम्यान, त्याने ताहिरच्या घराबाहेर शेकडो लोक एकत्र जमले आणि दगडफेक करताना पाहिले. त्याचवेळी काही तरुण एका व्यक्तीला मारहाण करत खेचत नेत होते. तो अंकित होता, ज्याचे कपडे फाटले होते. यानंतर त्यालाही चाकूने अंकितवर वार केले.आपचे नेते आयबी अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना भेटलेआयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या कुटुंबीयांकडून शुक्रवारी आप नेत्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यात आपचे ज्येष्ठ नेते दुर्गेश पाठक, नगरसेवक मनोज त्यागी व अन्य नेते उपस्थित होते. नेत्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. दुर्गेश पाठक यांनी कुटुंबियांना आश्वासन दिले की सरकार कुटुंबास सर्वतोपरी मदत करेल.

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसdelhiदिल्ली