शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मामासोबत बाईकवरून जात होता एमेझॉन कंपनीचा मॅनेजर; हल्लेखोरांनी डोक्यात झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 13:35 IST

हरप्रीतने बाईक थांबवताच हल्लेखोरांनी मामा-भाचाच्या डोक्यात गोळी झाडली.

दिल्लीत अज्ञात हल्लेखोरांनी बाईकवरून जाणाऱ्या मामा आणि भाचाच्या डोक्यात गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर तेथून पळ काढला. या घटनेत भाच्याचा जागीच मृत्यू झाला. तर मामा गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे प्रकरण भजनपुरा भागातील सुभाष विहारशी संबंधित आहे. येथे राहणारा हरप्रीत सिंह (36) मंगळवारी त्याचा मामा गोविंद यांच्यासोबत बाईकवरून कुठेतरी जात होता. त्यामुळे पाच जणांनी त्यांना वाटेत अडवलं. हरप्रीतने बाईक थांबवताच हल्लेखोरांनी मामा-भाचाच्या डोक्यात गोळी झाडली. यात हरप्रीतचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये गोविंद गंभीर जखमी झाले आहेत.

गुन्हा केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. गोविंद य़ांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना दिलशाद गार्डन येथील गुरु तेग बहादूर रुग्णालयात पाठवलं. सध्या गोविंद यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाच हल्लेखोरांनी ही घटना घडवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची माहिती गोळा करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृत हरप्रीत हा ई-कॉमर्स कंपनी एमेझॉनमध्ये मॅनेजर होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी