शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केस कापण्यातील चूक, दोन कोटींचा दंड; पंचतारांकित हॉटेलला आयोगाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 05:42 IST

सूचनेविरुद्ध केस कापणे ही सेवेत कमतरता असल्याचा आरोप करत तिने राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार दाखल करून पाच कोटी २० लाखांची भरपाई मागितली

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : चुकीचे केस कापल्याबद्दल दिल्लीच्या पंचतारांकित आयटीसी मौर्य हॉटेलने महिलेला दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई सव्याज द्यावी, असे आदेश राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिले आहेत.

आशना रॉय केसांची जाहिरात करत असे. केसांचे रंग व वाढ करणाऱ्या वस्तूंच्या जाहिरातीसाठी त्यांना मोठा मोबदला मिळत असे. २०१८ मध्ये आशना रॉय आयटीसी मौर्यमध्ये हेअर ड्रेसिंगसाठी गेल्या होत्या. त्यांनी विशिष्ट स्टाइलमध्ये केस कापण्याची सूचना केली. परंतु स्टायलिस्टने तिच्या सूचनेप्रमाणे केस न कापता तिचे केस लहान केले. केस कापल्यामुळे तिच्या मॉडेलिंग व्यवसायाचा नाश होणार या भीतीने तिच्या मनावर प्रचंड आघात झाला.

सूचनेविरुद्ध केस कापणे ही सेवेत कमतरता असल्याचा आरोप करत तिने राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार दाखल करून पाच कोटी २० लाखांची भरपाई मागितली. याला पुष्टी देण्यासाठी तिने व्हीएलसीसी आणि पँटिनच्या जाहिराती व माहिती पत्रकाच्या प्रती दाखल केल्या.

मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदाची संधी गेलीतिचा असाही युक्तिवाद होता की, दिल्लीतील एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदासाठी तिची मुलाखत होती. यावेळी नीटनेटके दिसावे म्हणून ती सलूनमध्ये गेली होती. निवड झाल्यास तिला पगार आणि इतर सुविधांची रक्कम मिळून वार्षिक एक कोटी मिळाले असते. केस कापल्यामुळे तिची ही संधीदेखील गेली. हे सिद्ध करण्यासाठी तिने कंपनीसोबत झालेला पत्रव्यवहार व ईमेलच्या प्रती सादर केल्या.राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि डॉ. एस. एम. कांतीकर यांच्या खंडपीठाने तिचा युक्तिवाद स्वीकारला. आयटीसी लिमिटेडने आशनाला तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून ९ टक्के व्याजासह दोन कोटी रुपये द्यावेत, असे आदेश आयोगाने दिले.

सुप्रीम कोर्टातही आयोगाचा निर्णय कायमराष्ट्रीय ग्राहक आयोगाने २०२१ मध्ये २ कोटी नुकसान भरपाई मंजूर केली होती. याविरुध्द आयटीसी सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने ही सेवेतील त्रुटी असल्याचे मान्य केले; पण नुकसान भरपाईच्या रकमेवर फेरविचार करण्यासाठी प्रकरण राष्ट्रीय आयोगाकडे परत केले. या वर निर्णय देताना रक्कम २ कोटीच ठेवली व यावर ९ %व्याज वाढवले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय