शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

कॉलर पकडल्यानं रागात होता सुशील, बदला घेण्यासाठी बोलावले गुंड; जाणून घ्या, 'त्या' रात्री नेमकं काय घढलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:52 IST

4 मेरोजी कुख्यात गँगस्टर काला जठेडीचे भाऊ सोनू, रविंद्र आणि इतरांचा मॉडेल टाऊनच्या फ्लॅटवरून पैलवान सुशील कुमार सोबत वाद झाला होते. त्या लोकांनी सुशीलची कॉलरही  पकडली होती. एवढेच नाही, तर त्याला पाहून घेऊ, असे म्हणत पळवूनही लावले होते. (Sagar rana murder case)

नवी दिल्ली - पैलवान सागर राणा हत्या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 4 मेरोजी पैलवान सागरची हत्या झाली होती. तपासातून समोर आले आहे, की त्या  दिवशी छत्रसाल स्टेडियमवर काही लोकांनी सुशील कुमारचा अपमान केला होता आणि याचाच बदला घेण्यासाठी त्याने हरियाणाहून गंड बोलावले होते. रात्री या गुंडांनी केलेल्या मारहाणीत सागरचा मृत्यू झाला होता. 

4 मेरोजी कुख्यात गँगस्टर काला जठेडीचे भाऊ सोनू, रविंद्र आणि इतरांचा मॉडेल टाऊनच्या फ्लॅटवरून पैलवान सुशील कुमार सोबत वाद झाला होते. त्या लोकांनी सुशीलची कॉलरही  पकडली होती. एवढेच नाही, तर त्याला पाहून घेऊ, असे म्हणत पळवूनही लावले होते. या अपमानामुळे सुशील रागाने लालबुंद झाला होता. खुन्नस आणि तणावात आल्याने त्याने त्याच दिवशी बदला घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने कुख्यात नीरज बवाना आणि असौदा गिरोहच्या गुंडांची मदत घेतली.

महिला खेळाडूचे कनेक्शन उघड; अटक कुस्तीपटू सुशील कुमारला मदत केल्याचा संशय 

पोलिसांचे म्हणणे आहे, की 4 मेरोजी दिवसा सुशील कुमार छत्रसाल स्टेडियमवर आला होता, तेव्हा त्याच्यासोबत फार पैलवान नव्हते. स्टेडियमवर अचानकच त्याची सोनू, सागर, अमित, भक्तू, रविन्द्र आणि विकास यांच्याशी शाब्दिक वाद झाला. येथे सुशीलचा जबरदस्त अपमानही केला गाले. त्यावेळी तर सुशील स्टेडियमवरून निघून गेला, मात्र, अपमानाचा बदला घेण्याचे त्याने ठरवले. अजय आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने गुंडांना फोन करून हरियाणाहून दिल्लीला बोलावून घेतले. सर्वप्रथम कुण्या एकाठिकाणी हे सर्व जण जमले. काहींनी तेथे दारू घेतली आणि जेवणही केले. 

यानंतर 5-6 कारने हे लोक रात्री 12 वाजताच्या सुमारास शालीमार बाग येथे रविंद्रच्या घरी पोहोचले. त्यावेळी रविंद्र आपल्या घराखाली असलेल्या एका दुकानासमोर आइस्क्रिम खात होता. रविंद्र आणि त्याचा साथीदार विकासला हे गुंड आपल्या कारमध्ये बसवून घेऊन गेले. यानंतर सर्वच मॉडेल टाउन येथील सोनूच्या फ्लॅटजवळ पोहोचले.

हत्येचे नाट्यरूपांतर करून सुशील कुमारची चौकशी, छत्रसाल स्टेडियममध्ये ठोस पुरावे शोधण्याचे प्रयत्न

तेथून सोनू, सागर, अमित आणि भक्तू यांना कारमध्ये बसवून सर्वांना रात्री साधारणपणे 1 वाजता छत्रसाल स्टेडियमवर नेले गेले. यानंतर येथीलपार्किंग भागात या सर्व सहा पैलवानांना सुशील आणि त्याच्या गुंडांनी काठ्या, दांडे, हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी सागर, सोनू आणि इतर लोकांना जनावराप्रमाणे मारहाण केली होती. एवढेच नाही, तर सोनूला मुत्र पाजण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. याच मारहाणीत सागर राणाचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारCrime Newsगुन्हेगारीWrestlingकुस्तीdelhiदिल्लीPoliceपोलिस