शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
2
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
5
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
6
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
7
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
8
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
9
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
10
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
11
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
12
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
13
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
14
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
15
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
16
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
17
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
18
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
19
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
20
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 21:03 IST

Delhi Police seized Cocaine: गेल्या आठवड्यात पोलिसांनी 5000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे.

Delhi News: दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलला ड्रग्जविरोधातील मोहिमेत पुन्हा मोठे यश मिळाले आहे. रमेश नगर भागातील एका गोदामातून पोलिसांनी सुमारे 200 किलो कोकेन जप्त केले आहे. बाजारात याची किंमत तब्बल 2000 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी आठवडाभरात मिळवलेले हे दुसरे मोठे यश आहे. गेल्या आठवड्यात महिपालपूर येथून 560 किलो कोकेन जप्त करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत तब्बल 5000 कोटी रुपये होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या सिंडिकेटशी संबंधित सातव्या आरोपीला अटक केली आहे. अखलाख असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील हापूरचा रहिवासी आहे. अखलाखची चौकशी केल्यानंतरच स्पेशल सेलने दिल्लीतील रमेश नगरमध्ये छापा टाकून 200 किलो कोकेन जप्त केले.

महिपालपूरमध्ये कोकेन सापडल्यानंतर खळबळ यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दक्षिण दिल्लीतील महिपालपूर भागातील एका गोदामातून 560 किलोहून अधिक कोकेन आणि 40 किलो 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त केला होता. यामध्ये सामील एक आरोपी युवक काँग्रेसचा माजी सदस्य आहे. यावरुन राजकारण सुरू झाले असून, भाजप काँग्रेसवर टीका करत आहे. तर, काँग्रेसने त्या व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगितले आहे.

कॉन्सर्ट आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापरस्पेशल सेलने तुषार गोयल, हिमांशू कुमार आणि औरंगजेब सिद्दिकीला दिल्लीतून अटक केली होती. तर एक आरोपी मुंबईचा रहिवासी आहे. या प्रकरणात तुषार गोयल हा या सिंडिकेटचा सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे सिंडिकेट दिल्ली आणि इतर मेट्रो शहरांमध्ये कॉन्सर्ट आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहितीही समोर आली आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थdelhiदिल्लीPoliceपोलिस