शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

Prince Raj Paswan Rape Case: खासदार प्रिन्स राज पासवान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; चिराग पासवान यांचेही नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 10:58 IST

Prince Raj Paswan Rape Case: पीडीत तरुणी लोजपाची कार्यकर्ता होती. तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.

बिहारच्या समस्तीपूरमधून लोकसभेवर निवडून गेलेले लोक जनशक्ति पार्टी (LJP) चे खासदार प्रिन्स राज पासवान (Prince Raj Paswan) यांच्याविरोधात दिल्लीमध्ये बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये चिराग पासवान (Chirag paswan) यांचेही नाव आल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Chirag Paswan's Cousin Prince Raj Booked for Rape in Delhi.)

जवळपास तीन महिन्यांपूर्वी एका पीडित तरुणीने दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता न्यायालयाचा आदेश आल्याने खासदार प्रिन्स राज पासवान (Prince Raj Paswan) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर 9 सप्टेंबरला नोंदविण्यात आला आहे.

पीडितेने प्रिन्स राज यांच्यावर तिचा अश्लिल व्हिडीओही बनविल्याचा आरोप केला आहे. बलात्कारानंतर वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची देखील धमकी देण्यात आली होती. तसेच या प्रकरणी पोलिसांत न जाण्यासाठी धमकविण्यात आले होते,  दबाव टाकण्यात आला होता. प्रिन्स हे चिराग पासवान यांचे चुलत भाऊ आणि केंद्रीय मंत्री पशुपती पारस पासवान यांचे पुतणे आहेत. 

FIR मध्ये चिरागचे देखील नावएफआयआरमध्ये चिराग पासवान यांचे नाव आले आहे. तिने चिराग पासवान यांना या घटनेबाबत सांगितले होते. तेव्हा चिराग पासवान यांनी काहीही एकून घेतले नाही. जेव्हा पोलिसांत जाण्याचे सांगितले तेव्हा चिरागने मला भेट दिली आणि कोणताही गुन्हा दाखल करू नको असे सांगितले. चिराग पासवानने पक्षाचा अध्यक्ष या नात्याने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप पीडितेने केला आहे.

तरुणी लोजपाची कार्यकर्ताही पीडीत तरुणी लोजपाची कार्यकर्ता होती. तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. प्रिन्सने देखील तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये तिने चुकीचे आरोप केल्याचे म्हटले आहे. चिराग आणि पशुपती यांच्यात जेव्हा पक्षावरून ओढाताण सुरु होती तेव्हा चिराग यांनी पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला होता. 

टॅग्स :BiharबिहारLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीdelhiदिल्लीPoliceपोलिस