शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

देशद्रोहाचा आरोप, दिल्ली पोलिसांनी शरजीलच्या विरोधात केले आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 16:37 IST

शरजील इमामवर देशद्रोही भाषण करून हिंसाचाराला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याला आणि एनआरसी च्या विरोध करणाऱ्या मोर्चात भडकाऊ भाषण करणाऱ्या जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी इमामविरोधात आयपीसीच्या कलम 124 ए (देशद्रोह) आणि 153 ए (धर्म, भाषा, वंश इत्यादींच्या आधारे लोकांमध्ये द्वेष पसरवणे) लावले होते.

शरजील इमाम याच्याविरुध्द दिल्लीच्या साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शरजील इमामवर देशद्रोही भाषण करून हिंसाचाराला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला आणि एनआरसी च्या विरोध करणाऱ्या मोर्चात भडकाऊ भाषण करणाऱ्या जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला पोलिसांनीअटक केली आहे. मात्र त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली होती. भारताला इस्लामिक देश करण्याचं स्वप्न आहे असं शरजीलने सांगितले होते. दिल्लीपोलिसांच्या चौकशीत हे समोर आलं होतं. दिल्ली पोलिसांनी त्याला २ जानेवारी रोजी बिहारच्या जहानाबाद येथून अटक केली.हिंसा भडकवल्याचा आरोपयाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदविला होता.  इमाम यांना बिहारच्या जहानाबाद येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर हिंसा भडकवण्याचा आरोप होता. इमामने केलेल्या कथित प्रक्षोभक  भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे भाषण 13 डिसेंबर रोजी देण्यात आले. तपासादरम्यान, पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी इमामविरोधात आयपीसीच्या कलम 124 ए (देशद्रोह) आणि 153 ए (धर्म, भाषा, वंश इत्यादींच्या आधारे लोकांमध्ये द्वेष पसरवणे) लावले होते.

 

दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, १५ डिसेंबर रोजी जामिया मिलियाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला आणि एनआरसीच्या विरोधात न्यू फ्रेंड्स कॉलनी आणि जामिया येथे मोर्चा काढला आणि त्या दरम्यान गंभीर हिंसाचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या काळात जाळपोळ व हिंसाचार झाला आणि दगडफेकही करण्यात आली. यामुळे सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दंगल, हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यासंबंधी गुन्हे दाखल केले होते. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एफआयआरच्या आधारे जामियामध्ये हिंसा भडकवल्याबद्दल शरजील इमामला अटक करण्यात आली होती. 

शरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती उघड

भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा मोठा कट?; शरजीलच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

शरजील इमामबरोबर तुम्ही आहात की नाही?, शहांचा केजरीवालांना थेट सवाल

शरजील इमामनंतर या तरुणीच्या वक्तव्यावरून वादंग, अफझल गुरू निर्दोष असल्याचा केला दावा

टॅग्स :Policeपोलिसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकArrestअटकdelhiदिल्लीCourtन्यायालयseditionदेशद्रोह