शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली पाेलीस आले, कारवाई करून गेले; मुंबईजवळ १७२५ काेटींचे हेराॅईन पकडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 09:50 IST

जेएनपीएच्या एका खासगी कंटेनर टर्मिनलमध्ये हे ड्रग्ज लिकोरिस लेपाच्या नावाखाली २१ जून २०२१ रोजी तस्करीच्या मार्गाने परदेशातून आणले होते.

लोकमूत न्यूज नेटवर्कउरण : येथील जेएनपीएच्या बंदरांत तस्करीसाठी आयात केलेल्या एका कंटेनरमधून १,७२५ कोटींचा ३५० किलोचा हेरॉईनचा साठा दिल्लीतील स्पेशल सेलच्या पोलिसांनी बुधवारी जप्त केला. कंटेनरच्या वजनासह त्यात एकूण २२ टन म्हणजेच ३५० किलो हेरॉईन होते, असे एका बंदर अधिकाऱ्याने सांगितले. हा साठा दुबईतून आल्याचे सांगण्यात येते. 

जेएनपीएच्या एका खासगी कंटेनर टर्मिनलमध्ये हे ड्रग्ज लिकोरिस लेपाच्या नावाखाली २१ जून २०२१ रोजी तस्करीच्या मार्गाने परदेशातून आणले होते. मात्र, हा कंटेनर नेण्यासाठी कोणतीही एजन्सी पुढे आली नसल्याने हा साठा वर्षभरापासून पडून होता. या कंटेनरवर कोणीही दावा केला नसल्याने संशय वाढला आणि शिताफीने लपवून ठेवलेला ३५० किलो हेरॉईनचा साठा सापडला.

वर्षभर कंटेनरमध्ये पडून हाेता माल; चेन्नईतील आरोपींनी दिली माहितीचेन्नई बंदरात काही दिवसांपूर्वी ३१२ किलो हेरॉईनचा साठा जप्त केला होता. या प्रकरणात मुस्तफा व रहिमउल्ला या दोन अफगाणी आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत जेएनपीए बंदरातील एका खासगी कंटेनर टर्मिनलमध्ये ३५० किलो हेरॉईनचा साठा दडवून ठेवला असल्याची माहिती उघड झाली होती. त्या माहितीच्या आधारे दिल्लीतील स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांच्या १६ सप्टेंबरला या कंटेनर टर्मिनलमधील संशयित कंटेनरचा शोध सुरू केला आणि  तपासणी केली. तेव्हा ४० फुटी कंटेनरमध्ये लिकोरिस लेपाच्या नावाखाली माल लपवल्याचे उघड झाले. 

गुजरातनंतरची मोठी कारवाईया साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १,७२५ कोटींच्या घरात असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधीही गुजरातमधील मुद्रा बंदरातून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सप्टेंबर २०२१ मध्ये २१ हजार कोटींचे तीन हजार किलो हेरॉईन पकडले होते. 

जूनमध्ये पकडले ३६२ कोटींचे ड्रग्ज नवी मुंबई पोलिसांनीही जून महिन्यात पंजाब पोलिसांच्या मदतीने ३६२ कोटींचा हेरॉईनचा साठा येथील खासगी कंटेनर यार्डमधून हस्तगत केला होता. याचा तपास एटीएसकडे सोपविला आहे. तपास यंत्रणांकडून या बंदरात दुसऱ्यांदा अशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

बंदरांच्या खासगीकरणामुळे तस्करी वाढल्याचा आरोपकारवाईदरम्यान दिल्लीतील स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस, सुरक्षा यंत्रणांना कोणतीही प्रकारची माहिती न देता कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळली. त्यामुळे जेव्हा ड्रग जप्त केल्याचे समजले, तोवर पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणा अंधारात होत्या. सध्या बहुतांश बंदराचे खासगीकरण झाले आहे. त्यामुळेच बंदरांतील तस्करीच्या प्रमाणात  मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचा आरोप कामगार संघटना करीत आहेत.

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई