दिल्लीच्या सरिता विहार परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, माय-लेकीचे मृतदेह बेडच्या आत सामान ठेवण्याच्या बॉक्समध्ये लपवून ठेवले होते. पोलिसांनी एका शेजाऱ्याला मुख्य संशयित मानलं असून त्याला पकडण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी पोलिसांना सामान विखुरलेलं आढळलं, मात्र कोणतीही वस्तू चोरीला गेलेली नाही. दोघींचा मृत्यू गळा आवळून किंवा गुदमरून झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १०:३० च्या सुमारास त्यांना सरिता विहारमधील आली विहार येथून एका घरात दोन मृतदेह आढळल्याचा फोन आला. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना महिला आणि चिमुकलीचा मृतदेह बेडच्या स्टोरेज बॉक्समध्ये लपवलेला दिसला. पोलिसांनी माय-लेकीला दिल्लीतील 'एम्स' (AIIMS) रुग्णालयात नेलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
ज्योती (३५ वर्षे) आणि त्यांची ६ वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी झालेल्या शवविच्छेदनानुसार, मृत्यूचं कारण गळा आवळणं आणि श्वास गुदमरणं असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी त्याच इमारतीत राहणारा ३५ वर्षीय अकाउंटंट दीन दयाल याला मुख्य संशयित मानलं आहे. तो पुतण्या असून सध्या फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.
शेजारी अजय कुमार गिरी आणि मुकेश कामत यांनी सांगितलं की, महिला पती आणि तीन मुलांसह राहत होती. घटनेच्या वेळी दोन मुलं शाळेत गेली होती, त्यामुळे ती सुरक्षित आहेत. जेव्हा पती रात्री ९:३० च्या दरम्यान घरी परतला, तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि दोन मुलं बाहेर बसली होती. काहीतरी अघटित घडल्याच्या भीतीने जेव्हा दरवाजा तोडून आत पाहिलं, तेव्हा सर्व सामान विखुरलेलं होतं, पण कोणतीही गोष्ट गायब नव्हती. बराच शोध घेतल्यावर माय-लेकीचे मृतदेह बेडच्या आत सापडले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : A woman and her daughter were found dead in a bed box in Delhi. Police suspect a neighbor in the double murder. The cause of death is suspected to be strangulation. A search is underway for the suspect.
Web Summary : दिल्ली के सरिता विहार में एक महिला और उसकी बेटी का शव बेड के बॉक्स में मिला। पुलिस को दोहरे हत्याकांड में एक पड़ोसी पर शक है। गला घोंटने से मौत होने की आशंका है। आरोपी की तलाश जारी है।