शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

करोडपती चोर! नेपाळमध्ये हॉटेल, यूपीत गेस्ट हाऊस, लखनौमध्ये घर; दिल्लीत केल्या 200 चोऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 11:37 IST

चोरट्याने चोरीच्या जोरावर दिल्ली ते नेपाळपर्यंत संपत्ती केली होती. दिल्लीत एकट्याने 200 चोऱ्या केल्या होत्या.

चोरी करून करोडोंची संपत्ती कमावणाऱ्या एका चोरट्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याने चोरीच्या जोरावर दिल्ली ते नेपाळपर्यंत संपत्ती केली होती. दिल्लीत एकट्याने 200 चोऱ्या केल्या होत्या. त्याला वेगवेगळ्या नावांनी नऊ वेळा अटक करण्यात आली, मात्र कुटुंबाची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थनगरमध्ये आरोपीने पत्नीच्या नावे गेस्ट हाऊस आणि नेपाळमध्ये स्वतःच्या नावाने हॉटेल उघडले होते. 

चोरीच्या घटना घडवून त्याने लखनौ आणि दिल्लीत घरं बांधली. 2001 ते 2023 या कालावधीत 15 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल टाऊन पोलिसांनी एका करोडपती हॉटेल व्यावसायिकाला घरात चोरीच्या आरोपाखाली पकडले आहे. मनोज चौबे असं आरोपीचं नाव आहे. जवळपास 25 वर्षांपासून तो कुटुंबापासून लपून दोन आयुष्य जगत होता. आरोपीने सुमारे 200 चोरीच्या घटना घडवल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय मनोज चौबे यांचे कुटुंब सिद्धार्थ नगर जिल्ह्यात राहत होतं, परंतु नंतर ते नेपाळमध्ये स्थायिक झाले. 1997 मध्ये मनोज दिल्लीला आला आणि त्याने कीर्ती नगर पोलीस ठाण्यात कॅन्टीन चालवायला सुरुवात केली. त्याने कॅन्टीनमध्ये चोरी केली आणि पकडला गेला, त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने घरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मोठी रक्कम मिळाल्यावर तो गावी परतायचा.

सुरुवातीला आरोपी मनोज भाड्याच्या घरात राहून चोरी करायचा. त्यासाठी तो आधी परिसराची रेकी करायचा, त्यानंतर मॉडेल टाऊन, रोहिणी, अशोक विहार, पितामपुरा आदी भागातील बंद घरे, घरे, फ्लॅट यांना टार्गेट करायचे. चोरलेल्या रकमेतून आरोपी मनोजने नेपाळमध्ये हॉटेल बांधले. यादरम्यान त्याने यूपीच्या पाटबंधारे विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलीशी लग्न केलं. दिल्लीत पार्किंगचे कंत्राट घेतो, असे त्याने सासरच्या मंडळींना सांगितले होतं. त्यामुळे कधी-कधी त्यांना वर्षातून सहा ते आठ महिने दिल्लीत राहावं लागतं असंही म्हणाला. 

सिद्धार्थनगरमधील शोहरातगडमध्ये त्यांनी पत्नीच्या नावावर गेस्ट हाऊस बांधले आहे. मनोजने आपली जमीन त्याच शहरातील एका हॉस्पिटलसाठी भाडेतत्त्वावर दिली होती, ज्यासाठी त्याला दरमहा 2 लाख रुपये भाडे मिळायचे. आरोपी मनोजने लखनौमध्ये कुटुंबासाठी बांधलेले घर घेतले. कोट्यवधींची मालमत्ता आणि लाखोंचे भाडे मिळूनही तो चोरी करण्यासाठी दिल्लीत यायचा. चोरीच्या एका घटनेत पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला.

पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये मनोजचा चेहरा दिसला. यानंतर तो एका ठिकाणी स्कूटीवर फिरताना दिसला. पोलिसांनी स्कूटीचा नंबर तपासला असता स्कूटी विनोद थापा याने विकत घेतल्याचे समोर आले. मनोजने सपना या नेपाळी मुलीशी लग्न केलं होतं. तिला दिल्लीत लपवून ठेवण्यात आलं होतं. सपनाचा भाऊ विनोदही येथे राहतो. विनोदने पोलिसांना सांगितले की, स्कूटी मनोज घेऊन फिरतो. यानंतर पोलिसांनी आरोपी मनोजला पकडलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी