शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Kanjhawala Case: क्रूरतेचा कळस! माहीत असूनही अंजलीला 12 किमीपर्यंत फरफटत नेले, आरोपींची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 13:46 IST

Delhi Kanjhawala Case: दिल्लीतील कंझावाला प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे.

Kanjhawala Accident Update:दिल्लीतील कंझावाला प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. दिल्लीपोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीत बसलेल्या आरोपींनी कबुली दिली आहे की, घटनेनंतर काही वेळातच मुलीचा मृतदेह गाडीखाली अडकल्याची माहिती मिळाली होती. मृतदेह बाहेर काढताना कुणी पाहिले तर आपण अडकू शकतो, या भीतीने आरोपींनी गाडी थांबवली नाही आणि अंजलीला तशाच अवस्थेत 12 किमी फरफडत नेलं. चालत्या वाहनातून मृतदेह आपोआप बाहेर पडेलल, असे आरोपींना वाटले होते.

म्हणजेच या आरोपींना त्यांच्या गाडीखाली एक मृतदेह अडकला असल्याची चांगलीच कल्पना होती. तरीदेखील त्यांनी पकडले जाऊ या भीतीने कित्येक किलोमीटरपर्यंत मृतदेह ओढत नेला. आरोपींनी स्वतः पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. यापूर्वी आरोपींनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली होती. गाडीत गाण्याचा मोठा आवाज होता, त्यामुळे अंजलीचा आवाज ऐकू आला नाही, अशी माहिती आरोपींनी दिली होती.

अंकुश खन्नाला जामीन मिळालाकंझावाला अपघात प्रकरणातील आरोपींचा बचाव करणाऱ्या अंकुश खन्ना याला दिल्ली न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. महानगर दंडाधिकारी सान्या दलाल यांनी शरणागती पत्करलेल्या खन्नाला जामीन मंजूर केला. त्याच्यावरील आरोप जामीनास पात्र असल्याचे निरीक्षण नोंदवून आरोपीला 20,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

काय घटना आहे?31 डिसेंबर-1 जानेवारी दरम्यान रात्री कंझावालाच्या रस्त्यावर जी घटना घडली, ती ऐकून प्रत्येकाचा थरकाप उडेल. रविवारी रात्री अंजली एका कार्यक्रमातून आपल्या स्कूटीवरून घरी परतत होती. यावेळी तिचा अपघात झाला ती गाडीखाली अडकली. यानंतर आरोपींनी अंजलीला सुमारे 12 किलोमीटर फरफडत नेले. यात अंजलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस