शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

3 लाखांची किडनी 30 लाखांमध्ये विकत होते, ऑपरेशन थिएटरही केलं होतं तयार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 12:26 IST

Delhi Crime News : पोलिसांनी सांगितलं की, यांनी आतापर्यंत 20 पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी 10 लोकांना अटक केली आहे.

Delhi Crime News : दिल्ली पोलिसांनी एनसीआरच्या एका मोठ्या किडनी रॅकेटच्या खुलाशानंतर बरीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. या रॅकेटच्या टार्गेटवर 20 ते 30 तरूण राहत होते. जे पैशांसाठी आपली किडनी विकण्यासाठी तयार राहत होते. पोलिसांनी सांगितलं की, यांनी आतापर्यंत 20 पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी 10 लोकांना अटक केली आहे.

26 मे रोजी हौज खास पोलीस स्टेशन परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर किडनी ट्रान्सप्लांट रॅकेटची सूचना मिळाली होती. पोलीस उपायुक्त बेनिता मॅरी जॅकरने सांगितलं की, कुलदीप रे विश्वकर्मा टोळीचा मुख्य होता आणि सोनीपतच्या गुहानामध्ये डॉ. सोनू रोहिल्लाच्या क्लीनिकमध्ये बेकायदेशीर किडनी रॅकेट चालवत होता.

मॅरी रॅकरनुसार, कुलदीप विश्वकर्माने सर्वांना त्यांच्या भूमिकांनुसार पैसे दिले होते आणि क्लीनिकमध्ये गेल्या सहा-सात वर्षात 12 ते 14 किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. तो टोळीतील काही सदस्यांसोबत दिल्लीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करत होता.

पोलिसांनुसार,  टार्गेट शोधण्याचं काम शैलेश पटेल, सर्वजीत जेलवाल यांना दिलं होतं. तर मोहम्मद लतीफला मेडिकल टेस्टचं काम दिलं होतं. विकास राहण्याची आणि ट्रॅवलिंगची जबाबदारी घेत होता. रंजीत पीडितांना हॉस्पिटलला नेण्याआधी त्यांची देखरेख करत होता.

पोलिसांनी सांगितलं की, रोहिल्लाशिवाय डॉ. सौरभ मित्तलही या बेकायदेशीर किडनी ट्रान्सप्लांटमध्ये सहभागी होता. पोलिसांनुसार, विश्वकर्माचे दोन सहकारी ओम प्रकाश शर्मा आणि मनोज तिवारी यांना अटक केली आहे. असं सांगितलं जात आहे की, टोळीकडून 3 लाख रूपयांमध्ये किडनी खरेदी केली जात होती आणि ती 30 लाख रूपयांमध्ये विकली जात होती.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी