शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

फेसबुकवरील मित्रासोबत लग्न करण्यासाठी लिंग परिवर्तन करून मुलगा बनला मुलगी, पण मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 14:56 IST

Delhi Crime News : पीडित तरूणाने आपलं ऑपरेशन करत लिंग परिवर्तन केलं. मुलगी बनल्यावर पीडितेने परिवाराला सोडलं आणि प्रियकराच्या बोलवण्यावरून ती दिल्लीला गेली.

जगभरात रोज वेगवेगळ्या विचित्र घटना घडत असतात. कधी या थक्क करणाऱ्या तर कधी विचारात पाडणाऱ्या असतात. अशीच एक विचित्र घटना दिल्ली पोलिसांसमोर (Delhi Crime News) आली आहे. दिल्लीतील मोहन गार्डन पोलिसांसमोर एका अजब तक्रार आली आहे. ही तक्रार फेसबुकवर प्रेमात मिळालेल्या दग्याबाबत आहे. आरोप आहे की, फेसबुकवर (Facebook Love Affair) एक तरूण मित्राच्या प्रेमात इतका हरवला की, तो मुलगी बनला. यासाठी त्याने त्याचं ऑपरेशन (Sex Change) करून घेतलं.

धक्कादायक बाब म्हणजे तरूणाने ज्याच्यासाठी इतकं मोठं पाउल उचललं तो तिला दगा देऊन आणि तिची फसवणूक करून फरार झाला. दिल्ली पोलिसांनी आरोपी विरोधात एफआयआर दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

काय आहे प्रकरण?

२४ वर्षीय पीडित तरूणी महाराष्ट्रातील आहे. ती तिच्या परिवारासोबत राहते. पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितलं की, फेसबुकच्या माध्यमातून तिची ओळख दिल्लीतील एका तरूणासोबत झाली होती. त्याने प्रेमाच्या शपथा घेतल्या आणि लग्न करणार असा विश्वासही दिला. 

यानंतर पीडित तरूणाने आपलं ऑपरेशन करत लिंग परिवर्तन केलं. मुलगी बनल्यावर पीडितेने परिवाराला सोडलं आणि प्रियकराच्या बोलवण्यावरून ती दिल्लीला गेली. दिल्ली ती त्या तरूणाला भेटली. तरूणाने तिला एका भाड्याने घेतलेल्या घरात ठेवलं. इथे दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले.

अनेकदा तरूणाने पीडितेसोबत दुष्कर्म केलं आणि प्रत्येकवेळी तिला लग्नाचं आमिष दाखवलं. काही दिवस हे असंच सुरू राहिलं. पण त्यानंतर आरोपी तरूणी तरूणीला सोडून फरार झाला. आपलं घर सोडून आलेली तरूणी चिंतेत फिरत राहिली आणि मग तिने तिच्या परिवाराला संपर्क केला.

त्यानंतर तिने दिल्लीच्या मोहन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये रेपसारखे गंभीर आरोप लावत गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलिसांची टीम आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीने पीडितेला तो व्यवसाय करत असल्याचं सांगत होता. पण नंतर पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, तो  एका शोरूममध्ये सेल्समनचं काम करत होता. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी