शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 19:52 IST

एका बसमधील चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चोर दिवसाढवळ्या बसमध्ये चढून प्रवाशांचे मोबाईल आणि पाकिटावर डल्ला मारतात. 

दिल्लीतील बसेसमध्ये आता चोरांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. हे चोर दिवसाढवळ्या बसमध्ये चढून प्रवाशांचा मोबाईल आणि पाकिटावर डल्ला मारतात. धक्कादायक बाब म्हणजे बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असूनही या चोरांना याचा अजिबात धाक राहिलेला नाही. ते अगदी उघडपणे चोरी करताना दिसतात. असाच एका बसमधील चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच असलेली पाहायला मिळत आहे. दिल्लीतील एका एसी बसचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामध्ये चोरांची गँग बसमध्ये चढते. एका व्यक्तीला ते घेरतात. काही समजायच्या आत अवघ्या काही सेकंदात ते त्या व्यक्तीचा मोबाईल खिशातून चोरतात आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने तो गुल करतात. 

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक व्यक्ती बसमध्ये चढताच, ४ ते ५ चोर त्याला सर्व बाजूंनी घेरतात. गर्दीचा फायदा घेत ते अत्यंत हुशारीने त्याच्या खिशातून मोबाईल काढतात आणि लंपास करतात. जेव्हा त्या व्यक्तीला कळतं की त्याचा मोबाईल हरवला आहे, तेव्हा तो इकडे तिकडे शोधू लागतो. पण चोर इतक्या हुशारीने फोन लपवतात की नेमका मोबाईल कोणी चोरला आहे हे त्या व्यक्तीला कळत नाही. 

चोरांची ही गँग इतक्यावरच थांबली नाही. तर त्यांचं धाडस बघा, फोन चोरल्यानंतर ते त्याच व्यक्तीशी असं बोलतात जणू काही त्यांनी काहीच केलेलं नाही. ते त्याच्याकडे  मोबाईल नंबरही मागतात जेणेकरून ते मोबाईल शोधण्यात मदत करत आहेत असं दाखवतात. ही संपूर्ण घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर @gharkekalesh नावाच्या पेजवर बसमधील चोरीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चोरांचा हा कारनामा पाहून सर्वांनाच धक्का बसला. काही लोकांनी त्यांना आलेला असाच अनुभवही शेअर केला आहे. माझा फोनही अशाच प्रकारे बसमधून, ट्रेनमधून चोरीला गेल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीtheftचोरीThiefचोरMobileमोबाइल