शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Deepali Chavan Suicide Case : विनोद शिवकुमार बालाचे तोंडावर बोट; दुसरी रात्रही पोलीस कोठडीत, महिला अधिकाऱ्याकडे तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 18:25 IST

Deepali Chavan Suicide Case: पोलीस कोठडीदरम्यान त्याने पोलिसांशी असहकार्याची भूमिका घेतली असून, तो तोंडातून ‘ब्र’ देखील काढत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देविनोद शिवकुमार बाला याला अमरावती ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ९ च्या सुुमारास नागपूर रेल्वे स्थानकाहून ताब्यात घेऊन धारणी पोलिसांकडे सुपूर्द केले होते.

धारणी (अमरावती) : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याची सलग दुसरी रात्र धारणी ठाण्याच्या कोठडीत गेली. मात्र, पोलीस कोठडीदरम्यान त्याने पोलिसांशी असहकार्याची भूमिका घेतली असून, तो तोंडातून ‘ब्र’ देखील काढत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.             

विनोद शिवकुमार बाला याला अमरावती ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ९ च्या सुुमारास नागपूर रेल्वे स्थानकाहून ताब्यात घेऊन धारणी पोलिसांकडे सुपूर्द केले होते. त्यामुळे शुक्रवारची रात्र त्याला धारणी पोलीस ठाण्यात काढावी लागली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता २९ मार्चपर्यंत पीसीआर सुनावण्यात आला. त्यानंतर शनिवार व लागोपाठ रविवारची त्याची रात्रदेखील सामान्य कैद्याप्रमाणे पोलीस कोठडीत जाणार आहे.             

धारणी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश एम. एस. गाडे यांनी पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याला शनिवारी दुपारी २ नंतर धारणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे सामान्य कैद्याप्रमाणे त्याला ठेवण्यात आले होते. जेवायला शासकीय डबा देण्यात आला. त्यानेही बाहेरचे जेवण किंवा इतर काही वस्तूची मागणी केली नाही. पोलीस कोठडीजवळ ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी एक अधिकारी व चार पोलीस कर्मचारी असे पाच जण तैनात ठेवले आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी शनिवारी रात्री चौकशी केली असता, त्याने काहीही कबुली दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनेचा तपास महिला एसडीपीओंकडेदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे यांच्याकडे होता. ते ३१ मार्चला सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांची मागणी झाल्याने विशेष महिला पोलीस तपास अधिकारी म्हणून मोर्शीच्या उपविभागीय अधिकारी पूनम पाटील यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.

Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण यांना मदत करता न आल्याने खंत; नवनीत राणा यांना अश्रू अनावर

 

Deepali Chavan Suicide Case: दीपालीच्या आत्महत्येवळी शिवकुमार हरिसाल परिसरात होता; निवासस्थानी गेला, फ्रेश झाला अन्...

 

आरोपीला तपासकामी चिखलदऱ्याला नेले

गुगामाल वन्यजीव विभागाचे कार्यालय चिखलदरा येथे असून, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बालाचे शासकीय निवासस्थानसुद्धा तेथेच आहे. कार्यालयीन कागदपत्रे व निवास्थानाहून त्याचा लॅपटॉप व गुन्ह्या संबंधित इतरही काही वस्तू जप्त करण्याकरिता त्याला रविवारी दुपारी २ वाजता दरम्यान चिखलदरा येथे नेण्यात आले.

अन्य वनपरिक्षेत्रातील अधिकारी शांत का?

गुगामल वन्यजीव विभागांतर्गत चिखलदरा, ढाकणा व तारुबांदा येथील तिन्ही वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी मौन साधले आहे. त्यांच्याकडून साधा निषेधही केला गेला नाही. त्यांचे मौन अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसAmravatiअमरावती