शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

Deepali Chavan suicide case: "प्रामाणिकपणे काम करून काहीच मिळालं नाही; शेवटी व्यवस्थेने घेतला बळी"; पतीने व्यक्त केला संताप   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 13:58 IST

Deepali Chavan suicide case: वरिष्ठ अश्लील बोलले हे सर्व सुसाईड नोटमध्ये लिहिलंय आहे, अशी खंत दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी व्यक्त केली.   

ठळक मुद्दे सुसाईट नोटमध्ये तिने लिहिलंय तिच्यासोबत जे घडलंय ते इतरांशी घडायला नको, म्हणून संबंधितांना अटक झाली पाहिजे ही तिची शेवटची इच्छा आहे.

धारणी (अमरावती) : महिला आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी डीएफओला अटक करण्यात आली असून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर रेल्वे स्थानकातून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. मला तिने सांगितलं होतं, तिला वरिष्ठांनी रडवले. सर्वांसमोर तिचा स्वाभिमान दुखावला. शेवटी तिने हा निर्णय घेतला. ऍट्रॉसिटी तिच्यावर दाखल करायला लावला, तिच्यावर वेगवगेळ्या चार्जशीट फाईल करायला लावल्या. प्रामाणिकपणे काम करून काहीच मिळालं नाही. शेवटी व्यवस्थेने तिचा बळी घेतला. सुसाईड नोटमध्ये तिने लिहिलंय तिच्यासोबत जे घडलंय ते इतरांशी घडायला नको, म्हणून संबंधितांना अटक झाली पाहिजे ही तिची शेवटची इच्छा आहे. वरिष्ठ अश्लील बोलले हे सर्व सुसाईड नोटमध्ये लिहिलंय आहे, अशी खंत दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी व्यक्त केली.   

मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. मृत चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून गुरुवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास धारणी पोलिसांनी डीएफओ विनोद शिवकुमार यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. अमरावती येथील इर्विन चौकात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दीपाली यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु आहे. दरम्यान दीपाली यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी छातीवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्याबाबत त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी गुगामाल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद आहे. या प्रकरणाने वनविभागात मोठी खळबळ माजली आहे. आएफएस व नॉन आयएफएसचा मुद्दादेखील ऐरणीवर आला आहे.

Deepali Chavan suicide case: दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी उपवन संरक्षक विनोद शिवकुमारला अटक

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभागAmravatiअमरावतीArrestअटकhospitalहॉस्पिटल