शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

Deepali Chavan Suicide: रात्री-बेरात्री बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न; डीएफओ शिवकुमारला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:16 IST

दीपाली चव्हाण आत्महत्या; आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल, तातडीने केले निलंबन

धारणी (जि. अमरावती) : मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभाग चिखलदराअंतर्गत हरिसालच्या वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ) दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक (डीएफओ) विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. 

दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून मध्यरात्री तीनच्या सुमारास धारणी पोलिसांनी शिवकुमार यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. वनविभागातच नव्हे तर, सोशल मीडियावरही ‘जस्टिस फॉर दीपाली चव्हाण’ अशी मागणी बुुलंद झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी यांच्या भूमिकेविरोधातदेखील संताप व्यक्त होत आहे.दीपाली यांनी त्यांच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी छातीवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. दीपाली दोन वर्षांपासून हरिसाल येथे कार्यरत होत्या. त्यांचे पती राजेश मोहिते (३०, रा. मोरगाव, जि. अमरावती) हे चिखलदरा येथे कोषागार कार्यालयात नोकरीला आहेत. 

सुसाईड नोटमध्ये काय?दीपाली यांनी ज्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली, तेथे धारणी पोलिसांना सुसाईट नोट मिळाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या नावे लिहिलेले हे तीन पानी पत्रात त्यांनी शिवकुमारकडून होत असलेल्या त्रासाबद्दल सविस्तर लिहिले आहे.  प्रशासकीय जाच, रात्री-बेरात्री संकुल, अकोट फाट्यावर बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न, सहकाऱ्यांदेखत होणारी अश्लील शिवीगाळ, शिवकुमार यांनी जाणूनबुजून जंगल फिरविल्याने गर्भपात झाल्याचे म्हटले आहे. आत्महत्येला शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई कराल, हीच शेवटची इच्छा, असे नमूद आहे.

शवविच्छेदन अमरावतीला, मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीनपोलिसांना घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ संजय काळे, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी घटनास्थळी धाव घेतली. पती राजेश मोहिते यांची तक्रार मध्यरात्रीच नोंदवून घेण्यात आली. त्यांनतर मृतदेह बंदोबस्तात अमरावती येथे नेऊन शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यांनतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव या मोहिते यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

उपवनसंरक्षक शिवकुमार निलंबितउपवनसंरक्षक दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी चिखलदरा येथील उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना निलंबित करण्यात आले आहे, तर अपर प्रधान मुख्य संरक्षक एम. एस. रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी शुक्रवारी हा आदेश काढला.

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणPoliceपोलिस