शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

खळबळजनक! घाटकोपरमध्ये तरूणाची हत्या; निलंबित पोलिसांचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 9:40 PM

खुनाचा गुन्हा घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला

ठळक मुद्देगणेश म्हस्के (२२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चार अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला हत्येचा कट हा निलंबित पोलिसानेच मित्रांसह आखल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई - गाडीला वाट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून घाटकोपरमध्ये तरुणाची काल मध्यरात्री हत्या करण्यात आली. गणेश म्हस्के (२२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चार अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून त्यांचा शोधासाठी पोलिसांचे पथक दापोली येथे रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  घाटकोपर (प.), साईनाथ नगर येथील रहिवासी असलेल्या गणेश म्हस्के काल मध्यरात्री परिसरातील एका रस्त्याच्या कडेला दुचाकी घेऊन उभा होता. त्यादरम्यान कारमधून चार जण तेथे आले आणि त्यांनी गणेशला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितली. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. बाचाबाचीनंतर चौघांनी गणेशला जबर मारहाण करत बाजूच्या नाल्यात ढकलून दिले. या घटनेनंतर चारही आरोपी कार सोडून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरूणाला गटाराबाहेर काढले. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरील दोन्ही गाड्या जप्त केल्या असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.एमेच ४६, यू - ०३०३ असा चारचाकीचा क्रमांक असून ही इनोव्हा कार जोगेश्वरी येथून आणली होती. चार आरोपींमध्ये एका निलंबित पोलीसाचा देखील सहभाग असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हत्येचा कट हा निलंबित पोलिसानेच मित्रांसह आखल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसGhatkoparघाटकोपर