शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयच्या माजी संचालकांचा मृत्यू; राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले

By पूनम अपराज | Updated: October 7, 2020 22:08 IST

Suicide : शिमला येथील 70 वर्षीय अश्विनी कुमार आपल्या रहात घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहे.

ठळक मुद्देएसपी शिमला मोहित चावला यांनी याबाबत माहिती दिली आहे.प्राथमिक माहितीनुसार अश्विनी यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, त्यांनी असे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापसमजू शकलेले नाही.

शिमला - मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांचे बुधवारी निधन झाले. शिमला येथील 70 वर्षीय अश्विनी कुमार आपल्या रहात घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. एसपी शिमला मोहित चावला यांनी याबाबत माहिती दिली आहे.प्राथमिक माहितीनुसार अश्विनी यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, त्यांनी असे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापसमजू शकलेले नाही. हिमाचलच्या सिरमौर येथे राहणारे अश्विनी कुमार ही 1973 बॅचचे आयपीएस अधिकारी होती. सीबीआयचे संचालक, हिमाचल प्रदेशचे डीजीपी याच्यासह अनेक पदांवर त्यांनी कामगिरी वाजवली आहे.हिमाचल पोलिसात डीजीपी असताना कित्येक मोठ्या सुधारणा केल्या2006 साली हिमाचल प्रदेश पोलिसांच्या डीजीपीचा कार्यभार घेतल्यानंतर अश्विनी यांनी येथे अनेक सुधारणा केल्या. हिमाचल पोलिसांचे डिजिटलायझेशन आणि स्टेशन स्तरावर संगणकाचा वापर त्यांनी सुरू केला. त्यांच्या कारकिर्दीतच तक्रारींची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली, यामुळे दुर्गम भागातील रहिवाशांना पोलिस ठाण्यात धाव न घेता ऑनलाईन तक्रार देणं सोईस्कर झालं.सीबीआयचे संचालक होणारे हिमाचलचे पहिले पोलिस अधिकारीअश्विनी कुमार जुलै २००८ मध्ये सीबीआय संचालक बनले होते. अश्विनी हिमाचल प्रदेशातील सीबीआय संचालक म्हणून काम करणारी पहिली पोलिस अधिकारी होते. मे २०१३ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने प्रथम त्यांना नागालँडचे राज्यपाल केले आणि त्यानंतर जुलै २०१३ मध्ये त्यांना मणिपूरचे राज्यपाल देखील केले होते.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग