शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तांग चावून केली हत्या, स्टेरॉइडसारख्या उत्तेजक पदार्थांच्या अतिसेवनाने घडला धक्कादायक प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 20:03 IST

नागपुरातील घटनेमुळे विचित्र वास्तव उजेडात : डॉक्टर, पोलीस सारेच चक्रावले

ठळक मुद्देनागपुरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडलेल्या एका थरारक हत्याकांडामुळे हे चक्रावून सोडणारे वास्तव उजेडात आले आहे.विक्रांत पिल्लेवार (वय २५) नामक एका नराधमाने त्याच्या पित्याचे गुप्तांग चावून तोडून काढले आणि गळ्यासह शरीराच्या अनेक नाजूक भागावर चावे घेऊन त्यांची अमानुष हत्या केली.

नरेश डोंगरे

नागपूर : स्टॅमिना गेन करण्यासाठी आणि स्वतःला पॉवरफुल बनविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या स्टेरॉईडसारख्या उत्तेजक पदार्थांचा डोस जास्त झाल्यास माणूस जनावर बनू शकतो. त्याची मानसिकता विकृत होते आणि तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. नागपुरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडलेल्या एका थरारक हत्याकांडामुळे हे चक्रावून सोडणारे वास्तव उजेडात आले आहे. यामुळे डॉक्टर पोलीस सारेच चक्रावले आहेत.विक्रांत पिल्लेवार (वय २५) नामक एका नराधमाने त्याच्या पित्याचे गुप्तांग चावून तोडून काढले आणि गळ्यासह शरीराच्या अनेक नाजूक भागावर चावे घेऊन त्यांची अमानुष हत्या केली. या घटने दरम्यान शेजार्‍यांनी धाव घेऊन त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. अवघा २५ वर्षांचा आरोपी आठ ते दहा लोकांना आवरत नव्हता. काही वेळातच तेथे पोलीस पोहोचले. पोलिसांनीही त्याला आवरण्याचा प्रयत्न केला मात्र सात ते दहा पोलीसांवर  आरोपी हावी झाला होता. त्याने अनेक पोलिसांना मारहाण केली त्याला कसेबसे आवरून मेडिकलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता तेथेही त्याने गोंधळ घातला आणि अनेकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची एकूणच स्थिती लक्षात घेता पोलिसांनी त्याचे हात-पाय करकचून बांधल्यानंतर त्याला कसेबसे रात्रभर ठेवले आणि रविवारी त्याची पोलिस कोठडी न मागता त्याला थेट कारागृहात पाठविण्याची विनंती न्यायालयात केली.

 दरम्यान, इतक्या क्रूरपणे जन्मदात्या वडिलांसोबत कुणी कसा वागू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिस या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी चौकशी करीत आहेत. प्राथमिक तपासात पोलिसांना आरोपीच्या घरात फ्रिज मध्ये आणि कार मध्ये मोठ्या प्रमाणावर स्टेरॉईड आणि सिरिंज सापडल्या. काही उत्तेजक औषधही सापडले. त्याची तपासणी केली असता अत्यंत धक्कादायक माहिती उजेडात आली. 

सूत्रांच्या माहितीनुसार, रेसमध्ये धावणाऱ्या घोड्यांना जे उत्तेजक द्रव्य इंजेक्शन मधून दिले जाते ते आरोपी विक्रांत पिल्लेवार स्वतः घ्यायचा. तो एका जिममध्ये पार्टनर कम ट्रेनर म्हणून काम करीत होता. सिक्स पॅक बॉडी बिल्डर असलेला विक्रांत स्वतःला मेंटेन करण्यासाठी नेहमी स्टेरॉइडसह अन्य काही उत्तेजक पदार्थ नियमित घेत होता. लॉकडाऊनमुळे जिम बंद झाल्याने त्याचे हेवी वर्कआऊट (व्यायाम) बंद झाले होते. मात्र तशातही उत्तेजक द्रव्य तो नेहमी घ्यायचा. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्याने उत्तेजक पदार्थांचा हेवी डोज घेतला. त्यानंतर तो डोके फिरल्यासारखा वागू लागला. दिवसभर त्याने विकृत चाळे केल्याने आई, बहीण आणि वडीलही बेचैन झाले. त्यांनी त्याला असे का वागतो, अशी विचारणा केली अन आक्रीत घडले.  त्याने वडिल विजय पिल्लेवार यांना बेदम मारहाण केली. त्यांचे गुप्तांग दाताने तोडून काढले. गळा आणि शरीराच्या इतर नाजुक भागावर ठिकठिकाणी जनावरासारखे चावे घेऊन त्यांची भीषण हत्या केली. तो जनावरासारखा वागत होता. हा सर्व परिणाम त्या स्टेरॉइड आणि अन्य उत्तेजक पदार्थाच्या अतिसेवनाचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी डॉक्टर्ससह अन्य तज्ञांशी चर्चा केल्यानंतर काढला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी विक्रांत पिल्लेवार याच्याकडे सापडलेल्या काही गोळ्या आणि सिरिंजमधून घेतले जाणारी औषधे पोलिसांनी तपासली.  रेस मध्ये धावणाऱ्या घोड्यांना जे उत्तेजक पदार्थ दिले जातात त्याच धरतीचे हे सर्व उत्तेजक पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या पदार्थांच्या अतिसेवनामुळे माणूस विकृतच होत नाही तर तो जनावरासारखा वागू शकतो, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बॉडी बनविण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी आणि स्वतःला पॉवरफुल बनविण्यासाठी स्टेरॉईड तसेच अन्य उत्तेजक पदार्थाचे सेवन करणाऱ्या मंडळींनी अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. 

सहज मिळतात उत्तेजक पदार्थ सध्या जिममध्ये जाण्याचे फॅड सर्वत्र चांगलेच वाढले आहे. जिममध्ये जाणाऱ्या मंडळींना अल्पावधीतच वेट लॉस, वेट गेन, पॉवर गेन करण्यासाठी आणि  मसल्स बनविण्यासाठी काही ट्रेनर किंवा जिममालक उलट-सुलट सल्ला देतात. ते त्यांना वेगळ्या प्रकारचे प्रोटीन पावडर आणि काही औषधेही उपलब्ध करून देतात. स्टेरॉईडही सहज मिळवून दिले जाते. काही महिन्यांपूर्वी मुंबईत अशाच एका बॉडीबिल्डरने स्टेरॉइडसचा हेवी डोज घेतल्याने त्याचा मृत्यू झाला होता. तर, आता अशा प्रकारच्या  उत्तेजक  पदार्थाच्या सेवनातून माणसाची वृत्ती जनावरासारखी बनू शकते, याचा भयावह प्रत्यय आला आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकnagpurनागपूर