शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

Bhaiyyu Maharaj: भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा; ब्लॅकमेल करणाऱ्या युवतीचं चॅट्स समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 18:10 IST

भय्यू महाराजांच्या आत्महत्येला ३ वर्ष उलटली. जून २०१८ मध्ये भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांवर योग्य तपास करत नसल्याचाही आरोप आहे.

इंदूर - अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या कथित आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. कोर्टात या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या व्हॉट्सअप चॅटनं सगळेच चकीत झाले आहेत. यामुळे तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे. भोपाळच्या फॉरन्सिक अधिकाऱ्याने १०९ पानाचं व्हॉट्सअप चॅट कोर्टासमोर सादर केले आहे. त्यात पलक आणि पीयूष जीजू यांच्यातील संवादाचा उल्लेख आहे. त्यात मांत्रिकाचाही उल्लेख दिसून येतो.

भय्यू महाराजांच्या आत्महत्येला ३ वर्ष उलटली. जून २०१८ मध्ये भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांवर योग्य तपास करत नसल्याचाही आरोप आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पलकचा मोबाईल जप्त केला. यातील व्हॉट्सअप चॅट डेटा रिकवर करण्यात आला. पलकने पीयूष जीजूसोबत भय्यू महाराजांबद्दल बोलल्याचं आढळलं. यात आयुषी आणि कुहूचाही उल्लेख आहे. डॉ. आयुषी ही भय्यू महाराजांची दुसरी पत्नी आहे. तर कुहू त्यांच्या मुलीचं नाव आहे.

या व्हॉट्सअप चॅटमधून भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यात काही कोडवर्ड आहेत. म्हणजे BM ला वेडं ठरवून घरात बसवणं. मांत्रिकासोबत २५ लाखांची डील झाली. पोलिसांनी पलकला भय्यू महाराज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली होती. अप्पर सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पलकनं भय्यू महाराजांचा अश्लिल व्हिडीओ बनवला होता. त्या माध्यमातून ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. भय्यू महाराज यांनी आयुषीसोबत १७ एप्रिल २०१७ रोजी लग्न केले होते. पलकने १ वर्षाच्या आत तिच्या लग्न करण्यासाठी दबाव टाकला. पलक २ वर्षापासून भय्यू महाराजांच्या संपर्कात होती. तिला महाराजांशी लग्न करायचं होतं परंतु भय्यू महाराजांनी डॉ. आयुषीसोबत लग्न केले.

काय आहे चॅटमध्ये?

पलक – आयुषीने मांत्रिकाला पकडलं आहे त्याच्याशी २५ लाखांची डील झालीय

पीयूष जीजू – कोणाशी?

पलक – मांत्रिकाशी

पलक –BM ला वेडं ठरवून घरात बसवायचं आहे

पीयूष जीजू – कुहू घरी येणार आहे. उद्या कुहूची रुम तयार होईल

पलक – कुहूने शरदला सांगितलं आहे. ती समोर आली तर तिला मारुन टाकेन

पलक – आयुषीने येऊन पुन्हा काम खराब केले

पलक – आयुषीने वहिनी आणि कुहूचे फोटो जाळून टाकले

काय आहे प्रकरण?

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी गोळी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणात विनायक आणि शरद नावाच्या २ सहकाऱ्यांनी अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पलकने भय्यू महाराजांचा अश्लिल व्हिडिओ बनवला होता. त्या माध्यमातून ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. पलकने भय्यू महाराजांवर लग्नासाठी दबाव टाकला होता. परंतु भय्यू महाराजांनी आयुषीसोबत लग्न केले. पलक, विनायक आणि शरद हे तिघं महाराजांची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करत होते. भय्यू महाराज आणि पलक यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग सुरु होते. त्यामुळे भय्यू महाराजांवर मानसिक दडपण आल्याचा आरोप आहे.