शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक बलात्कार आणि हत्या ? चापानेर शिवारात संशयास्पद अवस्थेत युवतीचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:09 IST

तरुणीवर बलात्कार करून हत्येच्या संशय आहे. 

ठळक मुद्देचापानेर येथे मिस्त्रीकाम करणारा उत्तरप्रदेशचा संशयित तरुण ताब्यात

कन्नड :  तालुक्यातील आठेगाव येथील १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह चापानेर शिवारात शुक्रवारी रात्री आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविराव रामलाल राव (२३, रा.  खलीलाबाद, संत कबीरनगर, उत्तरप्रदेश ह. मु. चापानेर ता.कन्नड ) यास संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर तरुणीवर बलात्कार करून हत्येच्या संशय आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच बलात्कार आणि हत्या यावर प्रकाश पडेल असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री आठ वाजले तरी सदर तरुणी घरी न आल्याने तिच्या आई वडील व नातेवाईकांनी शोधशोध सुरु केली. मात्र, तरुणी सापडली नाही. तरुणीच्या पालकांना रविराव यांच्यावर संशय आला. त्यास विचारपूस केली असता त्याने, मला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. यामुळे पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार ग्रामीण पोलिसात दिली. यानंतर पोलिसांनी संशयित रविराव यास ताब्यात घेवून विचारपुस केली. मात्र त्याने तोंड उघडले नाही. 

दरम्यान, पोलिसांनी तरुणीची शोध मोहीम सुरु केली. रात्री ११.३० वाजता पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे ,बीट जमादार मनोज घोडके यांनी आठेगाव ते चापानेर परिसर पिंजुन काढला. यावेळी चापानेर शिवारात तरुणीचा मृतदेह आढळून आला. रात्रीच तरुणीचे प्रेत शवविच्छेदनासाठी कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर युवतीच्या छातीचा एक वॉल निकामी असल्याने तिची प्रकृती नाजुक असल्याने तिचा नैसर्गिक मृत्यु झाला की खुन करण्यात आला याचा उलगडा होणे आवश्यक असल्याने शवविच्छेदनासाठी प्रेत घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.                               

संशयिताचे तरुणीच्या घरी होते जाणेयेणे संशयित आरोपी रविराव हा गेल्या सात ते आठ वर्षापासून चापानेर परिसरात घरातील फरशी बसविण्याचे मिस्त्री काम करतो. यातून त्याची तरुणीच्या वडिलांशी ओळख झाली व त्यांच्या घरी येणेजाणे वाढले. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून बलात्कार की खून अशा चर्चेला उधाण आले आहे. तरुणीची प्रकृती नाजुक होती तरुणीचा खून की बलात्कार हे शवविच्छेदन झाल्या नंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMurderखून