रिसोड येथे भरदिवसा चोरी; ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 06:23 PM2021-07-24T18:23:19+5:302021-07-24T18:23:47+5:30

Daytime theft at Risod : घटना रिसोड शहरातील अनंत कॉलनीत २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान घडली.

Daytime theft at Risod | रिसोड येथे भरदिवसा चोरी; ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

रिसोड येथे भरदिवसा चोरी; ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

googlenewsNext

रिसोड : बंद घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून ७० हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रिसोड शहरातील अनंत कॉलनीत २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान घडली. भरदिवसा चोरीची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे.
रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील प्रमोद प्रभाकर झडपे हे स्वस्त धान्य दुकान चालवत असून नेहमीप्रमाणे शनिवारीदेखील सकाळी साडेनऊच्या दरम्यान दुकानावर गेले. दुपारी १२ वाजता परत आले असता त्यांच्या घराचा कडीकोंडा व कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. आत बघितले असता त्यांच्या घरातील तीन खोल्यांमधील तीन कपाट उघडलेल्या अवस्थेत आढळून आले. एका कपाटातील एका किलो चांदीचे भांडे चोरी गेल्याचे समजते. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
 
पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
रिसोड शहरात यापूर्वीदेखील चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. भरदिवसा शहरात चोरी झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्रत्येक कॉलनीत पोलिसांची गस्त राहिल, याची व्यवस्था करावी अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.

Web Title: Daytime theft at Risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.