कारंजा शहरात भरदिवसा चोरी; २५ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:18 PM2021-04-27T12:18:56+5:302021-04-27T12:19:04+5:30

Burglary in Karanja city; पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत

Daytime burglary in Karanja city; Lampas looted Rs 25 lakh | कारंजा शहरात भरदिवसा चोरी; २५ लाखांचा ऐवज लंपास

कारंजा शहरात भरदिवसा चोरी; २५ लाखांचा ऐवज लंपास

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कारंजा येथील गुरुदेवनगरात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा एक घर फोडून २५.५० लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना २५ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. दरम्यान, घरमालकाच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 
कारंजा शहरातील बायपास परिसरातील गुरुदेवनगरात नगरे दाम्पत्य राहत असून ते कारंजा तालुक्यातील रामनगर येथील जि. प, शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. २५ एप्रिल रोजी नगरे दाम्पत्य दारव्हा तालुक्यातील हरूगोंडेगाव येथे अत्यावश्यक कामासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी ५.५० वाजता ते घरी परत आले असता घराचे मुख्य प्रवेशद्वार लावल्याचे, तर घराचे दरवाजे थोडे उघडे असल्याचे व दाराचे कुलूप खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घरात जाऊन पाहणी केली असता बेडरूममधील दोन खाण्याची रॅक उघडी दिसली. 
अज्ञात चोरट्यांनी सोन्याचा ७५ ग्रॅम वजनाचा राणीहार, १२० ग्रॅम वजनाच्या चार पाटल्या, २७ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, २७ ग्रॅम वजनाचा राणीहार असे नवीन ठेवलेले दागिने व ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा पोहेहार, ५२ ग्रॅम वजनाची दोन नेकलेस व अन्य दागिने असा एकूण २५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर  हात साफ केला. घरमालक मोतीराम तुकाराम नगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भांदविच्या कलम ४५४ व ३८० नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे. 
दरम्यान, चोरीच्या तपासासाठी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांची मदत घेण्यात आली; परंतु त्यात यश आले नाही. शहरात कोरोना लॉकडाऊनच्या काळात दिवसाढवळ्या चोरी झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कारंजा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली व तपासाबाबत पोलिसांना आवश्यक त्या सूचना केल्या.
(प्रतिनिधी)

Web Title: Daytime burglary in Karanja city; Lampas looted Rs 25 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.