शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

दाऊद कराचीमध्येच, ईडीसमोर भाचा अलीशाह पारकरने केलं कबूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 14:13 IST

Dawood Ibrahim : दाऊदचे कुटुंब सणासुदीच्या दिवशी आमच्या संपर्कात असतात अशी देखील माहिती अलीशाहने दिल्याने खळबळ माजली आहे.      

नवी दिल्ली -  भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमध्ये लपून बसल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब खुद्द दाऊदच्या भाच्यानेच केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे. दाऊदचा भाचा म्हणजेच हसीना पारकरचा (Hasina Parkar)  मुलगा अलीशाह पारकर याने अंमलबजावणी संचालनालयकडे (ईडी) (ED) आपला मामा म्हणजेच कुख्यात गुंड दाऊद (Dawood) पाकिस्तानात कराचीमध्ये (Karachi)  असल्याची कबुली दिली आहे. तसेच दाऊदचे कुटुंब सणासुदीच्या दिवशी आमच्या संपर्कात होता अशी देखील माहिती अलीशाहने दिल्याने खळबळ माजली आहे.   

अलीशाह पारकरने ईडीला सांगितले की, १९८६ ला दाऊदने भारत सोडला आणि फरार झाला. त्यांनतर जाणकर सूत्रांकडून दाऊद पाकिस्तानात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. दाऊद इब्राहिमला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

अलीशाह पारकर याने ईडीला पुढे सांगितले की, दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे. दक्षिण मुंबईतील डंबरवाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ते १९८६ पर्यंत राहत होते. मी काही स्त्रोतांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकले आहे की, दाऊद आता कराचीमध्ये आहे. पुढे पारकर म्हणाला, जेव्हा दाऊद कराचीला गेला होता. तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. आता मी किंवा माझे कुटुंब त्यांच्या संपर्कात नाही. होय, पण कधी-कधी ईद, दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाच्या निमित्ताने कुटुंबीय दाऊद इब्राहिमच्या संपर्कात होतं. दाऊद माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतो.दाऊद इब्राहिम भारतातील अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये वॉण्टेड असून, त्याचा अनेक दिवसांपासून शोध सुरू आहे. यापूर्वी, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 13 मे रोजी शहराच्या पश्चिम उपनगरातून गँगस्टर छोटा शकीलच्या दोन साथीदारांना फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमद्वारे चालवल्या जाणार्‍या गुन्हेगारी सिंडिकेटचे बेकायदेशीर कारवाया आणि आर्थिक व्यवहार हाताळल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. आरिफ अबुबकर शेख (59) आणि शब्बीर अबुबकर शेख (51) अशी त्यांची नावे आहेत.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPakistanपाकिस्तानunderworldगुन्हेगारी जगत